मुंबईत भांडुप येथे एक मोठा अपघात सोमवारी रात्री घडला आहे. बेस्टची एक बस रिव्हर्स घेत असताना नियंत्रण गमावल्यामुळे पादचाऱ्यांना धडकली, ज्यामध्ये ९ जण जखमी झाले असून चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना मुंबईच्या भांडुप परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बस अचानक अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या पादचाऱ्यांना चिरडले. अहवालांनुसार, या बेस्ट बसने सुमारे १० ते १२ लोकांना धडक दिली.
जखमींवर रुग्णालयात उपचार
या अपघातात जखमी झालेल्या सर्वांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी बस ताब्यात घेतली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती, ती पोलिसांनी नियंत्रणात आणून परिसर रिकामा केला.
चार जणांचा मृत्यू
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे, तर अनेक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा:
सर्वाधिक विकल्या गेलेल्या स्मार्टफोनचा मान आयफोन १६ ला
भारत २०३० पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे धोकादायक
सोन्यावरून युरोपमध्ये हाणामारी; सोने जनतेचे त्याला हात लावू नका, जॉर्जिया मेलोनी कडाडल्या
रिव्हर्स घेताना घडली घटना
अपघाताबाबत असा दावा केला जात आहे की, बस रिव्हर्स घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि पादचाऱ्यांना चिरडले गेले. कोणालाही पळून जाण्याची संधी मिळाली नाही. काही जणांना बसची धडक बसली, तर काही जण बसखाली अडकले, ज्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला आणि एक पुरुष असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मृत आणि जखमींबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर झालेली नाही.
गजबजलेल्या परिसरात अपघात
ही घटना भांडुप (पश्चिम) येथील स्टेशन रोडवर घडली, जिथे नेहमीच मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते. हा परिसर शहरातील अत्यंत गजबजलेल्या भागांपैकी एक मानला जातो.
चालक ताब्यात, चौकशी सुरू
पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कुर्ल्यातल्या घटनेची आठवण
ल्या वर्षी कुर्ल्यात अशीच घटना घडली होती आणि त्यावेळी बेस्टच्या बसने अनेकांना धडक दिली. त्यात ९ ठार आणि ३७ जखमी झाले. त्यात चालकाची चूक होती. त्याला इलेक्ट्रिक वाहनाचे प्रशिक्षण दिलेले नसल्यामुळे अपघात झाला होता.







