बिहारमधील गया येथे होमगार्ड भरती शर्यतीदरम्यान बेशुद्ध झालेल्या महिलेवर रुग्णवाहिकेत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दोनही आरोपींना अटक केली आहे आणि तपास सुरू केला आहे. ही घटना गयामधील बोधगया पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे बीएमपी ३ परेड ग्राउंडमध्ये होमगार्ड भरती प्रक्रिया सुरू आहे. होमगार्ड भरतीच्या शर्यतीत सहभागी होण्यासाठी एक महिला आली होती. शर्यतीदरम्यान, महिला उमेदवार बेशुद्ध पडली. त्यावेळी घटनास्थळी असलेल्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना तिच्यावर अत्याचार झाला.
ही घटना २४ जुलै रोजी घडली. शुक्रवारी एसएसपी आनंद कुमार यांनी एक प्रेस रिलीज जारी करून पीडितेने घटनेची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर दोन तासांच्या आत रुग्णवाहिका चालक विनय कुमार आणि तंत्रज्ञ अजित कुमार यांना अटक करण्यात आली. पीडितेने सांगितले की, तिला रुग्णालयात घेऊन जात असताना, रुग्णवाहिका चालक आणि तंत्रज्ञांनी चालत्या रुग्णवाहिकेत बलात्कार केला.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बोधगया एसडीपीओ सौरभ जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीम पाठवण्यात आली आणि घटनास्थळी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून दोन्ही आरोपींची ओळख पटवण्यात आली. या प्रकरणात बोधगया पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
हे ही वाचा :
जगभरात पुन्हा वाजला पंतप्रधान मोदींचा डंका
‘श्रवणकुमार’ बनले रामपूरचे चार भाऊ …
उर्जा क्षेत्र बळकट : राष्ट्राच्या प्रगतीचे शुभ संकेत
पुण्यातल्या मशिदींवरील भोंगेही आता उतरवणार!
एसएसपी आनंद कुमार म्हणाले की, या प्रकरणात जलद तपास करून आरोपपत्र सादर केले जाईल आणि जलद सुनावणी करून दोषीला कठोर शिक्षा दिली जाईल.







