बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा देशभरात उपस्थित केला जात असताना मुंबईतून बांगलादेशी घुसखोरांचा जन्म दाखला घोटाळा उघडकीस आला आहे. बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावले जात असतानाचं बांगलादेशी घुसखोरांचा जन्म दाखला घोटाळा समोर आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ‘एक्स’वर यासंबंधी पोस्ट करत माहिती दिली आहे. तसेच या संबंधित चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेने गोवंडी- देवनार येथील १८९ जन्म दाखले रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. बांगलादेशी घुसखोरांनी फसवणूक आणि बनावटगिरी करून हे दाखले मिळवले होते. किरीट सोमय्या यांनी यासंबंधी तक्रार दाखल केल्यानंतर देवनार पोलीस ठाण्यात ७/११/२०२५ रोजी एफआयआर क्रमांक ८९४ दाखल करण्यात आला होता. यानंतर तब्बल १८९ जन्म दाखले रद्द करण्यात आले असून किरीट सोमय्या यांनी काही आरोपींची नावेही दिली आहेत. या कारवाईनंतर मुंबई महानगरपालिकेने आरोग्य अधिकारी डॉ. संजय फुंडे आणि डॉ. प्रदीप काशाळे यांच्यासह चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
हे ही वाचा:
कंबोडिया- थायलंड तात्काळ युद्धबंदीवर सहमत!
मशिदीबाहेर ४५ वर्षे पडलेले दगड हटवल्यावर फोडली पोलिसांची डोकी
मुलुंडमध्ये ‘डिजिटल अटक’चा सापळा; निवृत्त कर्मचाऱ्याची २.०४ कोटींची सायबर फसवणूक
पाकिस्तानात नाही राहायचे, गेल्या वर्षी ७ लाख लोकांनी सोडला देश
दरम्यान, राज्यासह देशभरात बांगलादेशी घुसखोर आढळून येत आहेत. अशा घुसखोरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची सतत मागणी भाजपा करत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या राज्यातील अनेक जिल्ह्यांना भेट देवून अशा घुसखोरांची माहिती गोळा करत आहेत. जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयाला भेट देवून जन्म प्रमाण पत्राबाबत माहिती घेत आहेत. घोटाळ्यामध्ये सहभागी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी ते करत आहेत. मालेगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये असा घोटाळा झाल्याचा आरोप ते सतत करत असून त्यांनी पुरावे देऊन तक्रारही दाखल केल्या आहेत.







