उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील हरदुआगंज पोलीस स्टेशन परिसरात दिवसाढवळ्या एका भाजप नेत्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सोनू चौधरी असे मृत भाजप नेत्याचे नाव आहे. ते एक प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करत होते. २५ जुलै रोजी ते आपल्या कारमधून जात असताना काही अंतरावर दबा धरून असलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनू चौधरी यांच्यावर १२ गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी ७ गोळ्या त्यांना लागल्या. काही मानेला, काही खांद्यावर, तर काही थेट चेहऱ्यावर लागल्या. घटनेनंतर जवळ उभ्या असणाऱ्या लोकांनी त्यांना ताबडतोब मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेले, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
सोनू चौधरी हे खासदार सतीश गौतम यांच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते. या हत्या प्रकरणात खासदार सतीश गौतम म्हणाले, “सोनू चौधरी हा एक कष्टाळू पक्षाचा कार्यकर्ता होता. योगी सरकारमध्ये कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही. पोलिस लवकरच कारवाई करतील.”
हे ही वाचा :
पुण्यातल्या मशिदींवरील भोंगेही आता उतरवणार!
रिटायरमेंटनंतर अग्निवीरांना पोलीस भरतीत मिळणार २० टक्के आरक्षण
तेजस्वी निवडणूक का लढवणार नाही, हे स्पष्ट करा
सिस्तान-बलूचिस्तान प्रांतात दहशतवादी हल्ला
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस पथके पाचारण करण्यात आली आहेत. तपासात असे दिसून आले आहे की सोनूच्या भावाचीही २०१५ मध्ये हत्या करण्यात आली होती आणि त्याच वर्षी त्याच्या दुसऱ्या भावावरही हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.







