29 C
Mumbai
Tuesday, March 31, 2026
घरक्राईमनामामेट्रो बोगद्याजवळ बोअरवेल खणली, गुन्हा दाखल

मेट्रो बोगद्याजवळ बोअरवेल खणली, गुन्हा दाखल

आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार

Google News Follow

Related

मेट्रोची ‘अक्वा लाईन’ बेकायदेशीर बोअरवेल खोदणाऱ्यामुळे धोक्यात आली आहे.दक्षिण मुंबईतील हॉटेल,लॉज,खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पाणी सप्लाय करणाऱ्या ‘चंद्रमा वॉटर सप्लाय प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा जंक्शन येथे बेकायदेशीर परवानगी न घेता बोअरवेल ड्रिलिंग करताना मेट्रो बोगद्याला नुकसान केल्याप्रकरणी एका व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रमा वॉटर सप्लाय प्रायव्हेट लिमिटेडचे मालक रामबाबू राय यांनी मेट्रो जंक्शन परिसरात बोअरवेल ड्रिलिंग करताना निष्काळजीपणे काम केल्यामुळे मेट्रो बोगद्याच्या डाव्या बाजूस भोक पडले. ही घटना ५ मार्च २०२६ रोजी घडली असून, त्यानंतर तपास करून १३ मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

हे ही वाचा:

ईडीच्या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्या ममता सरकारला फटकारले

एअर इंडियाचे ग्राउंडेड Boeing 777 विमान पुन्हा सेवेत

सरकारचा मोठा डिजिटल स्ट्राईक

पश्चिम आशियात तेल वाहतुकीवर मोठं संकट

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 125, 324(5), 326(b) तसेच मेट्रो कायद्याच्या कलम 78 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संबंधितांनी बोअरवेलसाठी मुंबई महानगरपालिकेची (BMC) कोणतीही परवानगी घेतली नव्हती, असेही तपासात उघड झाले आहे.
पोलिस पुढील तपास करत असून, या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात टळल्याचे सांगितले जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा