20 C
Mumbai
Monday, January 24, 2022
घरक्राईमनामापाया कमकुवत झाल्यामुळे मुलाच्या डोक्यावर कोसळले झाड

पाया कमकुवत झाल्यामुळे मुलाच्या डोक्यावर कोसळले झाड

Related

अनिरुद्ध मचड या किशोरवयीन मुलाचा अंधेरी (पूर्व) येथे नारळाच्या झाडाखाली चिरडून मृत्यू झाल्याच्या एक दिवसानंतर, पालिकेच्या अंतर्गत अहवालात असे म्हटले आहे की, झाडाचा पाया अंतर्गतरित्या कमकुवत झाला होता त्यामुळे ही दुर्घटना घडली.

अवर लेडी ऑफ हेल्थ स्कूलचा आठवीचा विद्यार्थी अनिरुद्ध (१३) होता. सहार गावात गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ते पतंग उडवत असताना नारळाचे झाड त्याच्या डोक्यावर पडले. आणि त्याचा मृत्यू झाला. अनिरुद्धचे शुक्रवारी शवविच्छेदन करण्यात आले. आणि त्या अहवालात, अनेक जखमांमुळे मृत्यू झाला असे नमूद केले आहे.

अनिरुद्धचे वडील सुजित यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, संबंधित अधिकाऱ्यांच्या कोणत्याही प्रतिनिधीने चौकशीसाठी कुटुंबाशी संपर्क साधला नाही. आम्हाला अजूनही अपघाताचे कारण माहित नाही. झाडांची देखभाल करणे हे कोणाचे काम होते? असा प्रश्न सुजितने उपस्थित केला आहे.

पुढे ते हेही म्हणाले, ही घटना घडली तेव्हा सुजित घरापासून दूर होता. त्यांचा मुलगा जखमी झाल्याबद्दल त्यांच्या पत्नीने त्यांना फोन केला. त्याच्यासोबतच्या इतर मुलांनी त्याला त्वरित रुग्णालयात नेले.

हे ही वाचा:

शरद पवारांमध्ये दिसतो आशेचा ‘किरण’

सैन्यदिनानिमित्त लेहमध्ये जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज

महेश मांजरेकर म्हणतात, …कोन नाय कोन्चा, चित्रपट १८ वर्षांवरील प्रेक्षकांसाठीच!

…या वादातून महिलेने लहान मुलासह घेतली टॉवरवरून उडी

 

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ” ज्या रस्त्यावर झाड कोसळले तो रस्ता विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात होता. त्यांनी तो मेट्रो लाइन ३ च्या कामासाठी तो एमएमआरसीएलला दिला होता. रस्ता बॅरिकेड करून वाहनांसाठी बंद केला होता.आम्ही विमानतळ प्राधिकरणांना अतिवृद्ध झाडांची छाटणी करण्याची आणि मृत आणि धोकादायक झाडे काढून टाकण्याची विनंती केली आहे.”

पडलेल्या झाडाचे खोड कुजले होते आणि फांद्या पण मेलेल्या दिसत होत्या. झाडाची मूळसुद्धा कमकुवत दिसत होती. हे सगळं ऑडिटमध्ये ओळखणे अशक्य होते. पडलेले झाड कापून रस्त्यावरून काढण्यात आले आहे, असे एका अहवालात म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,588अनुयायीअनुकरण करा
5,780सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा