34 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरक्राईमनामाअभिषेक बॅनर्जींच्या घराबाहेरील अतिक्रमणावर बुलडोझर कारवाई

अभिषेक बॅनर्जींच्या घराबाहेरील अतिक्रमणावर बुलडोझर कारवाई

फुटपाथवरील बांबूचे बांधकाम हटवले

Google News Follow

कोलकाता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकात्यातील कालीघाट येथील निवासस्थानाबाहेर अतिक्रमणविरोधी कारवाई केली. त्यांच्या घरासमोरील फुटपाथवर उभारण्यात आलेले बांबूचे तात्पुरते बांधकाम बुलडोझरच्या सहाय्याने हटवण्यात आले. या बांधकामामुळे पादचाऱ्यांना ये-जा करताना अडथळा निर्माण होत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईपूर्वी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले होते.

अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईनंतर अभिषेक बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. “कितीही बुलडोझर आणले तरी माझा आवाज दाबता येणार नाही किंवा माझा निर्धार मोडता येणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी बंगालविरोधी शक्तींविरोधातील लढा सुरू ठेवेन,” असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, ही कारवाई अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षानंतर काही दिवसांतच करण्यात आली आहे. ७ नोव्हेंबर रोजी अभिषेक बॅनर्जी यांच्या ३९ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारी आणि दगडफेकीत झाले. या घटनेत दोन्ही बाजूंचे काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

हे ही वाचा:

कुराणातील आयत कोरलेल्या करीना कपूर खानच्या पेंडंटवर काँग्रेसचा संताप

छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला लोकलमधून ढकलले

किश्तवाडमध्ये ड्युटीवरून बेपत्ता झालेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची हत्या

कुलगाम हल्ल्यापूर्वीच सीआरपीएफ जवानांना मिळाला होता इशारा?

या घटनेनंतर अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता. तसेच, त्यांच्या घराजवळील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोपही त्यांनी भाजप समर्थकांवर केला होता. बुधवारी त्यांनी कोलकाता पोलिसांकडून आपल्या निवासस्थानावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा