गुजरातमध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. गांधीनगरमध्ये प्रशासनाकडून बुलडोझर कारवाई करण्यात येत आहे. सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू असून ७०० हून अधिक घरे आणि इतर बांधकामे जमीनदोस्त करण्याचे काम सुरू आहे.
गुजरातमधील गांधीनगरमध्ये पुन्हा एकदा मोठी बुलडोझर कारवाई सुरू करण्यात आली आहे. गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी साबरमती नदीकाठी ही कारवाई सुरू झाली आहे. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात बुलडोझर कारवाईला वेग आला आहे. कारवाई दरम्यान, कडक सुरक्षेत सरकारी जमिनीवर बांधलेली ७०० हून अधिक घरे आणि इतर बांधकामे पाडण्यात येत आहेत.
गांधीनगर जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, साबरमती नदीकाठी असलेल्या जीईबी, पेठापूर आणि चरेदी भागातील सरकारी जमिनीवर अतिक्रमण झाले होते. या परिसरातील लोकांना सरकारी जमिनी रिकामी करण्याचा अनेक वेळा इशारा देण्यात आला होता. मात्र, योग्य प्रतिसाद न मिळाल्याने गुरुवारी सकाळी, कडक सुरक्षेत, पथकांनी बुलडोझर कारवाई सुरू केली. जवळपास डझनभर बुलडोझर येथे कामाला लागले असून एकाच वेळी अनेक घरे पाडताना दिसत आहेत. अनधिकृत बांधकामांची संख्या ७०० हून अधिक असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
दिशा पटानी गोळीबार: हल्लेखोरांकडे सापडले पाकिस्तानी ड्रोनद्वारे तस्करी केलेले तुर्की पिस्तूल
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ईव्हीएम मतपत्रिकांच्या लेआउटमध्ये केले ‘हे’ बदल
पंतप्रधान मोदींचा वाढदिवस: राज्यातील ७५० गावात स्वच्छता अभियान संपन्न!
२६/११ मुंबई, संसद हल्ल्यामागे मसूद अझहरचं; जैशच्या कमांडरची कबुली
दरम्यान, बुलडोझर कारवाईचा निषेध करण्यासाठी पेटापूरमध्ये मोठा जमाव जमला होता. कडक सुरक्षा असूनही, लोक जोरदार निदर्शने करत राहिले. वातावरण तणावपूर्ण झाले. त्यानंतर झालेल्या गोंधळात एक बुलडोझर उलटला. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. पोलिस अधिकाऱ्यांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.







