उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात, असमोली पोलिस ठाणे हद्दीतील राय बुजुर्ग गावात एका बेकायदेशीर मशिदीविरुद्ध कारवाई केली जात आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, ही कारवाई तलावावर बांधलेल्या बेकायदेशीर मशिदीविरुद्ध आहे. प्रशासनाने मशीद तोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राय बुजुर्ग गावातील संबंधित मशीद ही सरकारी जमिनीवर बांधण्यात आली होती. यापूर्वीच मशीद प्रशासनाला सूचना देण्यात आली होती. तलावाच्या जमिनीवर ही मशीद उभारण्यात आली होती. कारवाईपूर्वी मशीद खाली करण्यात आली असून परिसरातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १० वर्षांपूर्वी ही मशीद बांधण्यात आली होती. महसूल विभागाच्या पथकाने महिनाभरापूर्वी मशीदीला भेट दिली होती, त्यानंतर प्रशासनाने मशीद पाडण्याची नोटीस बजावली.
मशिदीच्या आजूबाजूचा परिसर पोलिस छावणीत बदलण्यात आला आहे. मशीद पाडण्यापूर्वी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यांचे जवान आणि निमलष्करी दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. गावात शांतता बिघडू नये यासाठी पोलिस ध्वज मार्चही काढत आहेत. सध्या एसडीएम आणि सिटी मॅजिस्ट्रेटसह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. पोलिस सतत घोषणा करत आहेत की लोकांनी घरातच राहावे आणि बाहेर पडू नये.
हे ही वाचा:
गोल्डी ब्रार टोळीशी संबंधित दोन शूटर्सना अटक; मुनावर फारुकी होता लक्ष्य
बलात्कार प्रकरणी ब्रिटिश- पाकिस्तानी मोहम्मद जाहिदला ३५ वर्षांचा तुरुंगवास
‘त्या‘ फोटोमुळे पाक लष्करप्रमुख मुनीर बनले स्वतःच्याच देशात टीकेचे धनी
“अल्पसंख्याकांच्या छळाचा इतिहास असणारे मानवी हक्कांवर व्याख्यान कसे देऊ शकतात?”
संभल येथील रझा-ए-मुस्तफा मशीद तीन महिन्यांपूर्वी पाडण्यात आली होती. मशिदीवर ४० फूट उंच मिनार उभारण्यात आला होता. प्रशासनाने मशीद समितीला १९ जूनपर्यंत बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी मुदत दिली होती, परंतु समिती वेळेत ते हटवू शकली नाही. त्यानंतर, मशीद पाडण्याचे काम सुरू केले.







