34 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरक्राईमनामाकेजरीवालांना धमकी देणारा फोन बिष्णोई गँगचा नव्हे, भुरट्याचा

केजरीवालांना धमकी देणारा फोन बिष्णोई गँगचा नव्हे, भुरट्याचा

पोलीस तपासात खुलासा

Google News Follow

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन बनावट असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. फोन करणारी व्यक्ती हरियाणातील रोहतक येथील असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित व्यक्ती एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा संशय असून, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.

या प्रकरणात तिलक नगरचे आमदार जरनैल सिंह यांना धमकीचा फोन आणि व्हॉट्सअप संदेश पाठवण्यात आला होता. याप्रकरणी त्यांनी ६ नोव्हेंबर रोजी मोहालीच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे (एसएसपी) तक्रार दाखल केली होती. आरोपीने स्वतःची ओळख लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य अशी करून दिली होती. तसेच केजरीवाल यांच्याकडून सात कोटी रुपये मिळवून देण्याची धमकी दिली होती. पैसे न दिल्यास केजरीवाल आणि त्यांची मुलगी हर्षिता केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती.

या तक्रारीच्या आधारे मोहाली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सायबर क्राइम पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील कुमार यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

हे ही वाचा:

२०४७ च्या डेडलाईननुसार विकसित भारतासाठी सरकारचे काम सुरू!

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर वाजवली भोजपुरी गाणी

अभिषेक बॅनर्जींच्या घराबाहेरील अतिक्रमणावर बुलडोझर कारवाई

कुराणातील आयत कोरलेल्या करीना कपूर खानच्या पेंडंटवर काँग्रेसचा संताप

तपासादरम्यान पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकाचे कॉल डिटेल्स, आयपी लॉग आणि लोकेशनची माहिती तपासली. त्यातून धमकीचा कॉल बनावट असल्याचे स्पष्ट झाले. फोन करणारी व्यक्ती रोहतक येथील असल्याचेही समोर आले आहे. संबंधित व्यक्तीचा एखाद्या राजकीय पक्षाशी संबंध आहे का आणि त्याने हा बनावट कॉल करण्यामागे नेमका काय उद्देश होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा