29 C
Mumbai
Wednesday, February 25, 2026
घरक्राईमनामाघाटकोपरमध्ये रेल्वे पोलिस भर्तीदरम्यान तरुणाचा दुर्दैवी अंत

घाटकोपरमध्ये रेल्वे पोलिस भर्तीदरम्यान तरुणाचा दुर्दैवी अंत

दोनवेळा अपयशी ठरल्याने तिसऱ्यांदा केला होता प्रयत्न

Google News Follow

Related

रेल्वे पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घाटकोपर येथे घडली. १६०० मीटर धावण्याची मैदानी चाचणी पूर्ण केल्यानंतर तो अचानक कोसळला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

अक्षय मिसाळ (३०) असे मृत तरुणाचे नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी होता. रेल्वे पोलीस दलात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते. यापूर्वी दोन वेळा प्रयत्न करूनही अपयश आल्याने त्याने यंदा तिसऱ्यांदा अर्ज दाखल केला होता. भरतीसाठी तो मुंबईत आला होता.

हे ही वाचा:

‘राहुल गांधींना चॅटजीपीटीही विकृत ठरवते!’

अमेरिकन विमानवाहू नौकेतच मूलभूत सुविधांचा बोजवारा

सोनं-चांदीत सौम्य घसरण

१४ जूनला भारत–पाक महामुकाबला!

घाटकोपर पूर्व येथील रेल्वे पोलीस मैदानावर सोमवारी सकाळी मैदानी चाचण्या सुरू होत्या. सकाळी सुमारे दहा वाजता १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर अक्षय मैदानाच्या एका बाजूला येऊन बसला. त्यानंतर त्याला भोवळ येऊन तो खाली पडला. उपस्थितांनी तात्काळ त्याला राजावाडी रुग्णालय येथे दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पंतनगर पोलीस ठाणे येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपमृत्यूची नोंद केली. प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद बाब आढळून आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र नेमका मृत्यू कशामुळे झाला, याबाबत स्पष्टता नसून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. दरम्यान, भरती प्रक्रियेदरम्यान घडलेल्या या घटनेमुळे उमेदवारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
295,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा