23 C
Mumbai
Sunday, December 14, 2025
घरक्राईमनामासंसद घुसखोरी प्रकरण: नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंगनंतर प्रकरणाच्या मास्टरमाईंडचे नाव समोर

संसद घुसखोरी प्रकरण: नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंगनंतर प्रकरणाच्या मास्टरमाईंडचे नाव समोर

पोलिसांनी आरोपींची पॉलीग्राफी टेस्टही केली

Google News Follow

Related

संसद घुसखोरी प्रकरणात महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत. या प्रकरणातील आरोपींची नार्को आणि पॉलीग्राफी टेस्ट करण्यात आली आहे. पोलिसांनी या आरोपींचे ब्रेन मॅपिंगही केले आहे. दरम्यान, या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण आहे याबाबत मोठा खुलासा झाला आहे. संसद घुसखोरी प्रकरणाचा मास्टरमाईंड हा ललित झा नसून मनोरंजन डी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामागे ललित झा हा मास्टरमाईंड असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे, नीलम आजाद, ललित झा आणि महेश कुमावत या सहा आरोपींना पटियाला उच्च न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नीलम वगळता इतर पाच आरोपींना पॉलीग्राफी टेस्टसाठी गुजरातमध्ये नेण्यात आले होते. सागर आणि मनोरंजनचीही नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात आली होती. नीलमने या टेस्टसाठी सहमती दर्शवली नाही. त्यामुळे तिला या टेस्टसाठी नेण्यात आलेले नव्हते. इतर आरोपींच्या मात्र, टेस्ट करण्यात आल्या आहेत.

दरम्यान हे स्पष्ट झाले आहे की, आरोपींना सरकारपर्यंत एक मेसेज पोहोचवायचा होता. त्यासाठी संसदेत घुसखोरी करण्याची त्यांची योजना होती. मणिपूरचा प्रश्न, शेतकरी आंदोलन आणि बेरोजगारी या प्रश्नांवर आरोपींना आवाज उठवायचा होता. नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्टमधून मनोरंजन हा या घुसखोरीचा मास्टरमाईंड होता, हे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी पोलिसांनी ललीत झा ने घुसखोरी करण्यासाठी योजना आखली होती असे म्हटले होते.

हे ही वाचा:

वडिलांचे नाव नीट न लिहिता येणारे वडिलांचा वारसा कसा चालवणार?

आज मणिपूरपासून सुरू होणार काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा

५५ वर्षांचे संबंध संपवत मिलिंद देवरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

चीनपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध

प्रकरण काय?

संसदेचे अधिवेशन सुरु असताना काही आरोपींनी बरोजगारी आणि शेतकरी समस्यांवर आवाज उठवण्यासाठी संसदेत घुसखोरी केली होती. प्रेक्षक दालनातून यांनी उड्या मारल्या होत्या. लोकसभेत आणि संसदेच्या बाहेर तरुणांनी धुराच्या नळकांड्या फोडल्या यानंतर या प्रकरणी सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. त्यातील मुख्य आरोपीचे नाव समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींच्या नार्को टेस्टही करण्यात आल्या आहेत. संसदेच्या आवारात नळकांड्या फोडल्याचा व्हिडीओ ललित झा याने बनवला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा