सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात ‘अश्लील, आक्षेपार्ह आणि सामाजिक सलोखा बिघडवणारा’ मजकूर पसरवल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी काही लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन्स आणि इन्फ्लुएन्सर्सवर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली असून, त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सायबर विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यात स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे, हिमांशू जांगडा आणि डॉ. सेजल पवार यांच्यासह इतर काही सोशल मीडिया स्टार्सचा समावेश आहे. या सर्वांवर विविध प्लॅटफॉर्मवरून वादग्रस्त मजकूर प्रसिद्ध केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. केवळ सोशल मीडियावरील एंगेजमेंट आणि आर्थिक फायद्यासाठी काही मंडळी खालच्या पातळीवर जाऊन मजकूर प्रसिद्ध करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
हे ही वाचा:
‘मिस केरळ हर्षा सनी’ने बँकॉकहून आणले ११ कोटींचे अमली पदार्थ ?
तृणमूलनेही अभिषेकवर फेकली अंडी
पश्चिम आशियातील तणावामुळे शेअर बाजारात अस्थिरता
आकाशात झेपावला ‘आत्मनिर्भर भारता’चा नवा योद्धा
खालच्या पातळीची आणि अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप आहे. डेटिंगवर खर्च केल्यास शारीरिक संबंधांचा अधिकार मिळतो, अशा प्रकारचा अर्थ निघणारी टिप्पणी करून त्यांनी महिलांचा अपमान केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. वैद्यकीय शिक्षणात वापरल्या जाणाऱ्या मृतदेहांबद्दल अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मृत व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा हा अपमान असल्याचे सायबर विभागाने म्हटले आहे.
नोडेल सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७५(१)(iv), ७५(३), २९४ आणि ३५३(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
