27.5 C
Mumbai
Friday, July 11, 2025
घरक्राईमनामाबॉलीवूडमधील सेलिब्रेटी ईडीच्या रडारवर

बॉलीवूडमधील सेलिब्रेटी ईडीच्या रडारवर

ऑनलाईन बेटींग ऍपशी सबंधित ईडीची छापेमारी

Google News Follow

Related

बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. ईडीकडून मुंबईसह विविध राज्यात ३९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. महादेव ऑनलाईन बेटींग ऍपशी सबंधित ही छापेमारी करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री सनी लियोनी यांच्यासह अनेक दिग्गज सेलिब्रेटी ईडीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महादेव ऑनलाईन बेटींग ऍपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचा ईडीला संशय होता. याप्रकरणी मनी लाँन्ड्रींगचा गुन्हा दाखल करत ईडीने चौकशी सुरु केली आहे. ईडीकडून मुंबईसह विविध राज्यात ३९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. कोलकाता, रायपूर, छत्तीसगड, भोपाळ राज्यात छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीमध्ये ईडीने ४१७ कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता जप्त केली आहे.

हे ही वाचा:

ड्रग्स माफिया बेबी पाटणकरने सोने देण्याच्या नावाखाली फसवले

यापुढे उद्धव ठाकरे – कोश्यारींप्रमाणे विमानावरून भांडण होणार नाही!

दहशतवादी मुझफ्फर, फैसल यांना फाशीची शिक्षा

जो बायडेन यांच्या मुलाला ड्रग्जचे व्यसन, बंदूक बाळगण्याचा आरोप

महादेव ऑनलाईन बेटींग ऍपच्या माध्यमातून परदेशात काही इव्हेंट आयोजित करण्यात आले होते. इव्हेंटमध्ये संबंधित सेलिब्रिटींना बोलावण्यात आलं होतं. कार्यक्रमासाठी सेलिब्रिटींना मानधन रोख रकमेतून देण्यात आलं होतं. हे सगळे पैसे दोन नंबरचे असल्याचा संशय आहे. हॉटेल बुकिंग इतर पैसे रोख देण्यात आल्याची चर्चा आहे. याप्रकरणी सेलिब्रिटींनी ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागू शकतं. टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली यांची नावे या प्रकरणात समोर आली आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा