33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरक्राईमनामापुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेल्या रसायनाची अ‍ॅमेझॉनवरून खरेदी

पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेल्या रसायनाची अ‍ॅमेझॉनवरून खरेदी

Google News Follow

Related

पुलवामा येथे २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी ज्या रसायनाचा वापर बॉम्ब तयार करण्यासाठी केला होता ते रसायन अ‍ॅमेझॉन या संकेतस्थळावरून खरेदी करण्यात आले असून दहशतवाद्यांनी त्यापासूनच नंतर एकस्प्लोझिव्ह तयार केले, असा दावा कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सने (CAIT) केला आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफच्या ४० जवानांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने आपल्या अहवालात याबाबत माहिती दिली होती. अ‍ॅमेझॉनने दहशतवाद्यांनी खरेदी केलेल्या रसायनांची सविस्तर माहिती तपास यंत्रणांना दिली होती. अ‍ॅमेझॉनच्या मदतीनेच तपास यंत्रणांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. दहशतवाद्यांनी अ‍ॅमेझॉनवरून भारतात बंदी असलेले अमोनियम नायट्रेड आणि स्फोटक बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्यही खरेदी केले होते.

हे ही वाचा:

अनिल परब-शरद पवार वरळीत भेटले!

अभिनंदन! अभिनंदनचा वीर चक्रने सन्मान

शिवसेना जिल्हाप्रमुखाला ‘गुटखा’ पडला महागात

पठाणकोटमधील आर्मी कॅम्पवर ग्रेनेड हल्ला

एनआयएकडून करण्यात आलेल्या चौकशी दरम्यान अटक झालेल्या व्यक्तीने स्फोटके तयार करण्यासाठी अ‍ॅमेझॉनवरून आयईडी आणि इतर साहित्य खरेदी केल्याचे मान्य केले होते. तसेच दहशतवाद्यांनी या सर्व साहित्याचा वापर देशविरोधात केला असून हे पदार्थ विकणाऱ्या अ‍ॅमेझॉनविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी CAIT ने केली आहे.

अमोनियम नायट्रेटला २०११ मध्ये प्रतिबंधित वस्तू घोषित करण्यात आले होते. यासाठी स्फोटक कायदा, १८८४ अंतर्गत अमोनियम नायट्रेटची भारतात खुली विक्री, खरेदी आणि उत्पादनावर बंदी घालण्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा