27 C
Mumbai
Thursday, February 26, 2026
घरक्राईमनामा... म्हणून मुख्यमंत्री योगींनी सहा अधिकाऱ्यांना केलं निलंबित

… म्हणून मुख्यमंत्री योगींनी सहा अधिकाऱ्यांना केलं निलंबित

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या निर्णय सध्या चर्चेत आहे. पैसे घेऊन बदली करून देत असल्याच्या आरोपावरून योगींनी सहा अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी स्पेशल ड्युटी ऑफिसर अनिल कुमार पांडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच जेष्ठ अधिकार्‍यांचे निलंबन केले आहे.

उत्तर प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जितीन प्रसाद यांच्या विभागातील अधिकारी अनिल कुमार पांडे आणि पाच अधिकाऱ्यांवर हे आरोप करण्यात आले आहेत. आदित्यनाथ सरकारने कारवाई केलेले पांडे यांनी पूर्वीच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारमध्ये काम केले आहे. पांडे हे जितीन प्रसाद केंद्रात मंत्री असताना त्यांच्यासोबत काम करत होते. त्यामुळे पिडब्लूडी विभागातील अधिकाऱ्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे जितीन प्रसाद यांना मोठा धक्का बसला आहे.

मात्र, अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर प्रसाद यांनी एक निवेदन जाहीर केले. या निवेदनाद्वारे, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाशी असलेली बांधिलकी व्यक्त करत आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सरकारने उचललेल्या पावलांचे कौतुक केले आहे. त्यांनी आदित्यनाथ सरकारच्या विरोधात नाराजी असल्याच्या वृत्तांना खोडून काढले आहे.

हे ही वाचा:

६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; यादी वाचा सविस्तर

…म्हणून सलमान खानने घेतली पोलीस आयुक्तांची भेट!

मस्तीत मित्राला दिला धक्का आणि…

उत्तर प्रदेशचा अब्दुल जमील झाले श्रवणकुमार

यावेळी प्रसाद यांची भूमिका ब्रजेश पाठक आणि दिनेश खाटीक यांसारख्या काही मंत्र्यांनी यापूर्वी घेतलेल्या भूमिकेच्या विरुद्ध होती, ज्यांनी अलीकडेच जेष्ठ नोकरशहांना लक्ष्य करून सरकारच्या कार्यपद्धतीविरुद्ध आवाज उठवला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा