25 C
Mumbai
Wednesday, February 4, 2026
घरक्राईमनामाइथिओपियाहून ‘कॅप्सूल’ कोकेन तस्करी

इथिओपियाहून ‘कॅप्सूल’ कोकेन तस्करी

तिघे मुंबई पोलिसांच्या जाळ्यात, ३ किलो कोकेन जप्त

Google News Follow

Related

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश करत मुंबई पोलिसांनी आणि एनसीबीने संयुक्त कारवाईत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. इथिओपियाहून कॅप्सूलच्या स्वरूपात भारतात कोकेनची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर डोंगरी पोलिसांनी सप्टेंबर महिन्यात सबिना गेस्ट हाऊसमध्ये छापा टाकून तब्बल ३ किलो कोकेन जप्त केले होते. मात्र आरोपी फरार होते. अखेर सखोल तपासानंतर शुक्रवारी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

अटक केलेल्यांमध्ये तरुण कपूर (२६), हिमांशू शाह (२५) आणि साहिल अटारी (२५) यांचा समावेश आहे. एनसीबीने कस्टम अधिकाऱ्यांसह केलेल्या कारवाईत चेन्नई विमानतळावर शाह आणि अटारी यांना अटक करण्यात आली होती. झडतीत त्यांच्या ताब्यातून ५ किलो कोकेन सापडले. चौकशी दरम्यान दोघांनीही कपूर हा मुख्य सूत्रधार असल्याचे कबूल केले. त्यानंतर मुंबई एनसीबीने २ सप्टेंबर रोजी कपूरला डोंगरीतून ताब्यात घेतले होते.

हे ही वाचा:

दृष्टिबाधित महिला टी-२० विश्वकप : भारताची मोठ्या दिमाखात सेमिफायनल गाठली

मुंबईत ‘शस्त्र विक्री’चा कट उधळला!

कॅप्टन गिल मैदानात कधी उतरणार?

पहिल्या टेस्टमध्ये आफ्रिका पराभवाच्या छायेत!

तपासा दरम्यान डोंगरी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कपूरने सबिना गेस्ट हाऊसच्या एका खोलीत अमली पदार्थाचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे १५ कोटी रुपये किमतीचे ३ किलो कोकेन जप्त करण्यात आले. आरोपी या प्रकरणी चेन्नईत न्यायालयीन कोठडीत असल्‍याने प्रोडक्शन वॉरंट काढून त्यांना मुंबईत आणण्यात आले व ताब्यात घेण्यात आले.

कपूर आणि अटारी हे हिमाचल प्रदेशचे, तर शाह हरियाणाचे रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. कपूर ऑगस्टमध्ये इथिओपियाला जाऊन माल घेऊन आला होता. त्यानंतर शाह आणि अटारीदेखील तिथे गेले; मात्र चेन्नई विमानतळावर कन्साइनमेंटसह त्यांना पकडण्यात आले. आरोपींचा इथिओपियातील एक पंजाबमूळ मित्र त्यांना ड्रग्ज पुरवित असल्याची माहितीही समोर आली आहे. तिघांनाही शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून १८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे (झोन १) यांनी दिली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा