31.3 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरक्राईमनामापरदेशातील मित्रांच्या नावाने पैसे उकळण्याचा नवा मार्ग!

परदेशातील मित्रांच्या नावाने पैसे उकळण्याचा नवा मार्ग!

Google News Follow

सायबर गुन्ह्याचे नवनवीन प्रकार समोर येत असतानाच आता या चोरट्यांनी नागरिकांना लुटण्यासाठी नवीन शक्कल लढवल्याचे समोर आले आहे. परदेशात ज्यांचे मित्र किंवा नातेवाईक आहेत अशा लोकांना त्यांच्या नावे संपर्क करण्याची नवी शक्कल या चोरट्यांनी काढली आहे. अमेरिकेतील मित्राच्या नावाने व्हाट्सएपच्यामार्फत संपर्क करून १० लाखांच्या फसवणुकीचे प्रकरण मध्य विभागाच्या सायबर पोलिसांनी नुकतेच सोडवले. अशाच घटना मुलुंड आणि कुलाबा येथे घडल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

समाज माध्यमांच्या मदतीने अनेक सायबर गुन्हे सतत घडत असतात. आता या सायबर चोरट्यांनी व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्क करून पैसे उकळण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. मध्य विभागाच्या सायबर पोलिसांनी नुकतीच कांदिवली येथून सम्राट चौधरी या व्यक्तीला अटक केली आहे. सम्राट याने अजय मेहता यांना अनोळखी क्रमांकावरून व्हाट्सएपवर संदेश पाठवला होता. त्याने प्रोफाईलला सोमेश्वर यांचा फोटोही लावला होता. संदेशात त्याने आपण त्यांचे अमेरिकेचे मित्र श्रीराम सोमेश्वर असल्याचे सांगितले आणि तात्काळ पैशांची गरज असल्याचे भासवून बँक खात्यात १० लाख जमा करण्यास सांगितले. त्यानुसार अजय यांनी बँक खात्यात १० लाख जमा केले. त्यानंतर अजय यांनी त्यांच्या मित्राला संपर्क केला असता त्यांनी असा कोणताही संदेश पाठवला नसल्याचे अजय यांना सांगितले. त्यावेळी अजय यांना आपली फसवणूक झाल्याचे उघड झाले.

हे ही वाचा:

देवी पावली…अखेर महाराष्ट्रातील मंदिरे उघडणार

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत शुभम कुमार अव्वल

४ ऑक्टोबरपासून शाळांमध्ये होणार किलबिलाट

भारताशी संबंध दृढ करण्यातच अमेरिका आणि फ्रान्सचे हित

मुलुंडमधील ७५ वर्षीय डॉक्टरचीही अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे समोर आले होते. डॉक्टरांना एके दिवशी त्यांच्या बहारीन येथील मित्राच्या नावाने संपर्क करण्यात आला. मात्र, तेव्हा ते डॉक्टर शस्त्रक्रियेत व्यग्र असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र त्याच मित्राच्या नावाने त्यांना व्हाट्सएपवर संदेश पाठवून दीड लाखांची मागणी करण्यात आली. या डॉक्टरांनी दीड लाख सांगितलेल्या बँक खात्यात दिले असता नंतर काही दिवसांनी त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कुलाबा येथील ७५ वर्षीय नौदल अधिकाऱ्यालाही असेच संदेश येऊन त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले होते.

अशा प्रकारचे संदेश आल्यास सर्वप्रथम ज्या व्यक्तीच्या नावाने संपर्क केला आहे त्या व्यक्तीला स्वतः संपर्क साधून खात्री करणे आवश्यक आहे. व्हाट्सएपसह इतर समाज माध्मांवरील प्रोफाईलवर ‘टू फॅक्टर ऑथेंटिकेशन’ पर्याय निवडणे आवश्यक आहे, असे मत सायबरतज्ज्ञ विकी शाह यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा