गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई करत एका डॉक्टरसह तिघांना अटक केली आहे. रासायनिक शस्त्रे आणि जागतिक दहशतवादी नेटवर्कशी संबंध असल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित आरोपी नियोजित दहशतवादी हल्ल्यांमध्ये वापरण्यासाठी एरंडेल बीन्सपासून मिळणारे अत्यंत घातक विष, रिसिन विकसित करत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. अटक करण्यात आलेल्यांत डॉ. अहमद मोहियुद्दीन सय्यद, आझाद सुलेमान शेख आणि सुहेल मोहम्मद सलिम यांचा समावेश आहे.
देशात एरंडेलच्या बियांपासून तयार केल्या जाणाऱ्या ‘रिसिन’ नामक विषाच्या माध्यमातून भयंकर हल्ला करण्याचा एक कट उधळून लावला. या कारवाईत चीनमध्ये एमबीबीएस केलेल्या एका डॉक्टरसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या माध्यमातून एका संशयित दहशतवादी सिंडिकेटचा पर्दाफाश झाला आहे. या तिघांकडून तीन पिस्तूल, ३० काडतुसे आणि एरंडीचे चार लिटर तेल, तीन मोबाइल आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
डॉ. अहमद मोहियुद्दीन सय्यद, आझाद सुलेमान शेख व सुहेल मोहम्मद सलिम यांचा समावेश आहे. या तिघांनी लखनौ, दिल्ली आणि अहमदाबादमध्ये अनेक संवेदनशील ठिकाणांची रेकी केली होती. या कटातील म्होरक्या मध्य आशियातील खुरासान येथील ‘इस्लामिक स्टेट’शी संबंधित आहे, अशी माहिती गुजरात एटीएसचे उपमहासंचालक सुनील जोशी यांनी दिली. डॉ. सय्यद हा उच्चशिक्षित आणि कट्टरवादी असून मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी आवश्यक पैसा उभा करणे आणि त्यासाठी तरुणांची भरती करण्याची योजना त्याने आखली होती. त्याचा खुरासान येथील म्होरक्या पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून या टोळीला शस्त्रे पाठवत होता, अशी माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर नमाज पठण; भाजपाची सिद्धरामय्या सरकारवर टीका
अमेरिकन व्यक्तीला २,००० डॉलर्स मिळणार!
मुस्लिम, ख्रिश्चनांसाठी संघाचे दरवाजे उघडे, पण भारतमातेचे पुत्र म्हणून या!
वैश्विक आर्थिक वाढीत भारताचा वाटा ८-१० टक्के
सय्यद व्यतिरिक्त अन्य दोन आरोपी आझाद सुलेमान शेख आणि मोहम्मद सुहेल मोहम्मद सलीम हे उत्तर प्रदेशचे रहिवासी असून, त्यांना बनासकांठा जिल्ह्यातून अटक करण्यात आली. या दोघांनी राजस्थानच्या हनुमानगडमधून शस्त्रे मिळवून ती डॉ. सय्यदला पुरवली होती. डॉक्टरने साथीदारांच्या मदतीने दहशतवादी हल्ला करण्यासाठी एरंडीच्या बियांवर रासायनिक संशोधन सुरू केले होते. यासाठी आवश्यक उपकरणे, कच्चा मालही जमा करून ठेवला होता. विष तयार करण्यासाठी आवश्यक प्रारंभीची रासायनिक प्रक्रियाही त्याने सुरू केली होती.







