दिल्ली ब्लास्ट प्रकरणातील तपास आता वेगाने सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस जारी करून असे डॉक्टर जे परदेशातून एमबीबीएसची पदवी घेतली आहे आणि सध्या दिल्लीमध्ये डॉक्टर म्हणून काम करत आहेत, त्यांची माहिती मागवली आहे. विशेषतः पाकिस्तान, बांगलादेश, यूएई आणि चीन येथून एमबीबीएस केलेल्या डॉक्टरांची माहिती सादर करण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हा निर्णय सुरक्षा कारणास्तव घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत, परदेशातून प्रशिक्षित डॉक्टरांची सर्व माहिती पोलिसांना उपलब्ध करून द्यावी लागेल.
यापूर्वी, २६ नोव्हेंबर रोजी दिल्ली ब्लास्ट प्रकरणात एनआयएने (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) आरोपी शोएबला १० दिवसांच्या रिमांडवर घेतले. शोएबला फरीदाबाद येथून अटक करण्यात आली होती. त्याला पाटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले आणि न्यायालयाने एनआयए रिमांडला मंजुरी दिली. या प्रकरणातील आणखी एक आरोपी आमिर राशिद अली, ज्याची एनआयए कोठडी त्याच दिवशी संपत होती, त्यालाही कोर्टात हजर करण्यात आले आणि त्याची कोठडी आणखी ७ दिवस वाढवण्यात आली.
हेही वाचा..
इस्रायलच्या हल्ल्यात सीरियामधील १३ जणांचा मृत्यू; दहशतवादी मारले गेल्याचा दावा
गायीचे निकृष्ठ तूप विकणाऱ्या पतंजलीला दंड
इम्रान खान यांच्यावरून पाकिस्तान पेटणार!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासावर येतोय माहितीपट
एनआयएच्या माहितीनुसार, शोएबने डॉ. उमर मोहम्मद (उर्फ उमर उन नबी) याला स्फोटापूर्वी आश्रय दिला होता. त्याचबरोबर स्फोटाची योजना राबवण्यासाठी आवश्यक लॉजिस्टिक सपोर्टही पुरवला होता. ही कार बॉम्बस्फोटाची घटना १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ घडली होती. यात अनेकांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले. शोएब हा या प्रकरणातील अटक झालेला सातवा आरोपी आहे. यापूर्वी एनआयएने उमरचे सहा निकटवर्तीय सहयोगी अटक केले होते. एजन्सीने सांगितले की ती सुसाइड बॉम्बिंगशी संबंधित सर्व पुरावे आणि संशयितांना शोधण्यासाठी विविध राज्यांमध्ये छापेमारी करत आहे. या हल्ल्यामागील संपूर्ण दहशतवादी नेटवर्क उध्वस्त करणे, हा एनआयएचा उद्देश आहे.







