दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय राजधानीत मोठी कारवाई करत २५ बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी गुरुवारी (२५ सप्टेंबर) ही माहिती दिली. अतिरिक्त पोलिस उपायुक्त (DCP) ऐश्वर्या शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर परदेशी नागरिकांच्या उपस्थितीबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या व्यक्ती कोणतीही वैध कागदपत्रे किंवा व्हिसा नसतानाही दिल्लीमध्ये राहात होते.
ही कारवाई दिल्ली पोलिसांकडून सध्या सुरू असलेल्या विशेष मोहिमेचा भाग होती, ज्याचा उद्देश राष्ट्रीय राजधानीत बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या स्थलांतरितांची ओळख पटवणे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे हा आहे.
अधिकार्यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या सर्व व्यक्तींची पार्श्वभूमीची चौकशी सुरू असून, या प्रकरणात संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यात येत आहे. या व्यक्तींना पुढील कारवाईसाठी परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडे (FRRO) सोपवले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये हद्दपारीचाही समावेश होऊ शकतो.
ही कारवाई दक्षिण दिल्लीतील महिपालपूर परिसरातून दोन बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना अटक केल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, या दोघांचा व्हिसाची मुदत जवळजवळ एक दशकापूर्वी संपली होती. त्यानंतर, त्यांना परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालय (FRRO) कडे सोपवण्यात आले.
हे ही वाचा :
“भारताला शिक्षा करायची नाही, पण…” अमेरिकेचे ऊर्जा सचिव काय म्हणाले?
‘हिंदूंचं राष्ट्र, येथे कुणाचं दुसऱ्याचं चालणार नाही’
लेहमधील हिंसक आंदोलनासाठी सोनम वांगचुक जबाबदार!
‘आय लव्ह महादेव’ पोस्टवरून गुजरातमध्ये संघर्ष, दगडफेक, वाहने जाळली!
५ महिन्यांत ९०० बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची ओळख पटली
मे महिन्याच्या सुरुवातीला, दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की जानेवारी ते मे या कालावधीत राष्ट्रीय राजधानीत राहणाऱ्या सुमारे ९०० बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवण्यात आली आहे आणि योग्य पडताळणीनंतर त्यांना हद्दपार केले जाईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांना हद्दपार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली, असे पोलिसांनी सांगितले. भारत सरकारच्या सुरू असलेल्या ‘पुश-बॅक’ धोरणांतर्गत सहा महिन्यांच्या कालावधीत, दिल्लीतील अंदाजे ७०० कागदपत्रे नसलेल्या स्थलांतरितांना बांगलादेशला परत पाठवण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.







