31 C
Mumbai
Tuesday, March 10, 2026
घरक्राईमनामापुण्यात डंपरने नऊ जणांना चिरडले; मद्यधुंद चालकाला केली अटक

पुण्यात डंपरने नऊ जणांना चिरडले; मद्यधुंद चालकाला केली अटक

अपघातात तीन जणांचा मृत्यू तर सहा जण जखमी

Google News Follow

Related

पुण्यातील वाघोली येथे एक भीषण अपघात झाला असून भरधाव डंपरने फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर लोक जखमी आहेत. यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपी डंपर चालकाला अटक केली आहे.

काही महिन्यांपूर्वी पुण्यात हिट अँड रनचे प्रकरण घडली होते. देशभरात या प्रकरणाची चर्चा झाली होती. यानंतर आता पुन्हा एकदा डंपर अपघात प्रकरण समोर आले आहे. रविवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास पुण्यातल्या वाघोलीतील केसनंद फाट्यावर हा अपघात घडला. यावेळी डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आहे. या डंपर चालकाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. गजानन तोटे असे डंपर चालकाचे नाव आहे.

वाघोली येथील केसनंद फाट्यावरुन पुण्याच्या दिशेने येणाऱ्या या डंपरने नऊ जणांना चिरडले. वाघोली चौकातील वाघोली पोलीस ठाण्यासमोरच ही घटना घडली. बिल्टवेल इंटरप्राईजेस कंपनीचा हा डंपर असून डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त सर्वजण कामगार असून ते अमरावतीहून पुण्यात कामासाठी आले होते. या अपघातावेळी फुटपाथवर १२ जण झोपले होते. तर काहीजण फूटपाथच्या बाजूला असलेल्या झोपडीत झोपले होते. दाम्र्यान, फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांमध्ये दोन बालकांसह त्यांच्या काकाचा समावेश आहे. या घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

हे ही वाचा: 

ठाकरेंच्या अटी-शर्थींवर शिक्कामोर्तब… मात्र, जिंकले अदाणी

पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या काश्मिरी दहशतवाद्याला बंगालमध्ये अटक!

‘पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान’

दिल्लीतील बांगलादेशी होणार हद्दपार

दुर्घटनेत विशाल विनोद पवार (वय २२ वर्ष), वैभवी रितेश पवार (वय एक वर्ष) आणि वैभव रितेश पवार (वय दोन वर्ष) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, जानकी दिनेश पवार (२१), रिनिशा विनोद पवार (१८), रोशन शशादू भोसले (९), नगेश निवृत्ती पवार (२७), दर्शन संजय वैराळ (१८), आलिशा विनोद पवार (४७) हे सहा जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील जखमींवरआयनॉक्स हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांना ससून रुग्णालयात रवाना केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा