29 C
Mumbai
Monday, April 20, 2026
घरक्राईमनामा‘भोंदू बाबा’ अशोक खरातच्या साम्राज्यावर ईडीचा हातोडा

‘भोंदू बाबा’ अशोक खरातच्या साम्राज्यावर ईडीचा हातोडा

११ ठिकाणी छापे, कोट्यवधींचा मनी लॉन्ड्रिंग रॅकेट उघड

Google News Follow

Related

नाशिकमधून कथितपणे ‘भोंदू बाबा’ म्हणून कारभार चालवणाऱ्या अशोक खरात याच्या अवैध आर्थिक साम्राज्यावर प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) सोमवारी पहाटे मोठी कारवाई केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने नाशिक, शिर्डी आणि पुणे येथे एकाच वेळी ११ ठिकाणी धाड टाकत खरातच्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यास सुरुवात केली आहे.

या कारवाईत नाशिकमधील ५, शिर्डीतील ३ आणि पुण्यातील ३ ठिकाणांचा समावेश असून, खरातचे निवासस्थान, नातेवाईकांची घरे, व्यावसायिक आस्थापने तसेच संबंधित सहकारी संस्थांची कसून तपासणी करण्यात आली. या झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात महत्त्वाची कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची नोंद जप्त करण्यात आली असून, यामुळे या रॅकेटचे आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

अयोध्या राम जन्मभूमी मंदिरातील ‘ज्योती स्वरूप’वरून वाद

आशाताईंची ती अखेरची पोस्ट खूप काही सांगून गेली!

अलविदा आशाताई!

पुरुष पोलिस कॉन्स्टेबलला धर्मांतरित केले, निकाह करायला भाग पाडले!

दरम्यान, तपासात खरातने फसवणुकीसाठी बनावट बँक खात्यांचे जाळे उभारल्याचे उघड झाले आहे. नाशिकमधील दोन सहकारी पतसंस्थांमध्ये विविध व्यक्तींच्या नावाने खाती उघडण्यात आली होती; मात्र सर्व खात्यांमध्ये नॉमिनी म्हणून स्वतः खरातचे नाव नोंदवले होते. विशेष म्हणजे, या सर्व खात्यांना एकाच मोबाईल क्रमांकाशी जोडण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण व्यवहारांवर त्याचे नियंत्रण होते.

या खात्यांच्या माध्यमातून धार्मिक सेवांच्या नावाखाली उकळलेली रक्कम, तसेच ठगी आणि खंडणीतून मिळालेला पैसा वेगवेगळ्या मार्गाने फिरवून मनी लॉन्ड्रिंग करण्यात येत असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. प्राथमिक तपासात कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांचे धागेदोरे समोर आले असून, या प्रकरणात आणखी मोठे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा