25 C
Mumbai
Friday, January 23, 2026
घरक्राईमनामाईडीकडून ‘ऍमवे’ कंपनीची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त

ईडीकडून ‘ऍमवे’ कंपनीची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त

Google News Follow

Related

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने मोठी कारवाई करत नेटवर्क मार्केटिंग कंपनी ‘ऍमवे’ला (Amway) मोठा दणका दिला आहे. ईडीने या कंपनीची तब्बल ७५७ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने ‘ऍमवे’ कंपनीच्या पाच ऑफिसवर छापेमारी केली आहे.

जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यातील जमीन आणि कारखान्याची इमारत, प्लांट आणि मशिनरी, वाहने, बँक खाती आणि मुदत ठेवी यांचा समावेश आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणांतर्गत ईडीने केलेल्या तपासात एमवे डायरेक्ट सेलिंग मल्टीलेव्हल नेटवर्कच्या नावाखाली पिरॅमिड फसवणुकीत सामील असल्याचे उघड झाले आहे.

‘ऍमवे’ कंपनीने २००२ ते २०२२ या कालावधीत आपल्या व्यवसायातून २७ हजार ५६२ कोटी जमा केले आहेत. तसेच या कंपनीने भारत, अमेरिकेतील सदस्य आणि वितरकांना ७ हजार ५८८ कोटी रुपयांचे कमिशन दिले आहे. मात्र, उत्पादनांवर कंपनीचे लक्ष नसून मल्टीलेवल मार्केटींग हा कंपनीचा मूळ उद्देश आहे.

हे ही वाचा:

मराठीहृदयसम्राट ते हिंदुजननायक

PFI च्या नेत्यांना बंदीची धास्ती…

गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

“ईडीची कारवाई २०११ च्या तपासाशी संबंधित असून तेव्हापासून आम्ही ईडीला सहकार्य करत आहोत. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आम्ही अधिक भाष्य करू शकत नाही,” असे स्पष्टीकरण ‘ऍमवे’ कंपनीकडून देण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा