धार्मिक शब्द पुटपुटत हवाईदल अधिकाऱ्याच्या पत्नीचे धर्मांतरण

वर्गमित्र असलेल्या अय्याज ताज मदारेला अटक

धार्मिक शब्द पुटपुटत हवाईदल अधिकाऱ्याच्या पत्नीचे धर्मांतरण

व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये २४ वर्षीय महिला घाबरून “छोडो मुझे (मला सोडा)” असे ओरडताना दिसते. तिचा माजी वर्गमित्र अय्याज ताज मदारे (२६) तिचे हात जबरदस्तीने पकडून धार्मिक शब्द पुटपुटत होता आणि वारंवार तिच्यावर फुंकर मारत होता, तर ती स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत होती. महिलेचा आरोप आहे की त्यानंतर तिला धर्मांतरित झाल्याचे घोषित करण्यात आले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हा व्हिडिओ नागपूरमधील एका भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीच्या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा म्हणून समोर आला आहे. महिलेने आरोप केला आहे की, तिला अमली पदार्थ देण्यात आले, तिच्यावर बलात्कार करण्यात आला, अश्लील व्हिडिओंच्या आधारे ब्लॅकमेल करण्यात आले, लाखो रुपये उकळले गेले आणि धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला.

पोलिसांनी व्हिडिओतील मजकुराची पुष्टी केली असून, तो पीडित महिलेने तिच्या तक्रारीसोबत पुरावा म्हणून दिला असल्याचे सांगितले आहे. तसेच त्याची पडताळणी सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पोलिसांनी अय्याज मदारे आणि अमीन शेख (३०) यांना अटक केली आहे. तर तिसरा आरोपी हजरत मौलाना, जो मध्य प्रदेशातील तमिया येथील रहिवासी आहे, त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार २४ वर्षीय महिलेचा पती भारतीय हवाई दलात कार्यरत असून सध्या दुसऱ्या शहरात नियुक्त आहे. महिला प्रॉपर्टी डीलिंगचे काम करते.

फेब्रुवारी २०२५ मध्ये अय्याजने कथितपणे प्लॉट खरेदी करण्याच्या बहाण्याने तिच्याशी संपर्क साधला आणि तिला वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावले. महिलेचा आरोप आहे की तिला नशेचे औषध मिसळलेला ज्यूस देण्यात आला आणि ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तसेच या कृत्याचे व्हिडिओ आणि फोटो काढण्यात आले.

तक्रारीनुसार, त्यानंतर आरोपीने हे अश्लील व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल केले, वारंवार लैंगिक शोषण केले आणि तिच्याकडून ३.०९ लाख रुपये उकळले. महिलेने पुढे आरोप केला की तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि धार्मिक विधींच्या नावाखाली विविध कृती करण्यास भाग पाडले गेले.

हे ही वाचा:

एलन मस्क यांचे ‘क्वाड्रिलियनियर’ होण्याचे स्वप्न

अमेरिका-इराण शांतता कराराचा भारताला मोठा फायदा

नीट परीक्षेपूर्वी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी

अमेरिका-इराण शांतता कराराचा भारतासाठी अर्थ काय?

तिच्या म्हणण्यानुसार, मे महिन्यात आरोपी तिला नागपूरमधील कळमेश्वर येथे घेऊन गेला, जिथे तिची ओळख अमीन शेख आणि हजरत मौलाना यांच्याशी करून देण्यात आली. तक्रारीनुसार, तिघांनी तिला एका निर्जन ठिकाणी नेले, काही धार्मिक विधी केले आणि व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे तिचे धर्मांतर पूर्ण झाल्याचा दावा केला. तसेच तिचे अय्याज मदारेशी लग्न झाल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा आरोपही तिने केला आहे.

तीन दिवसांपूर्वी तिचा पती ड्युटीवरून घरी परतल्यानंतर महिलेने त्याला या कथित घटनांची माहिती दिली. त्यानंतर सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी बलात्कार, खंडणी उकळणे, जबरदस्ती धर्मांतराचा प्रयत्न तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे.

Exit mobile version