मदरशातील शिक्षकासोबत लग्न ठरल्याने मुलीने संपवले जीवन

मदरशातील शिक्षकासोबत लग्न ठरल्याने मुलीने संपवले जीवन

केरळमधील कासारगौड जिल्ह्यातील १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने मदरशातील शिक्षकासोबत लग्न ठरवण्यात आल्यानंतर आत्महत्या केली. उंदराचे विष प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मृत विद्यार्थिनीची ओळख मुबस्सिरा अशी झाली असून ती यू. अब्दुल रहमान आणि यू. एम. फातिमा यांची मुलगी होती. हे कुटुंब कैथक्कड-पय्यांकी बिस्मिल्ला रोड परिसरात राहत होते. ही घटना चेरूवथूर येथे घडली. मुबस्सिरा ही पय्यांकी येथील रहिवासी असून ती अलवरदा महिला महाविद्यालयातमध्ये शिक्षण घेत होती. काही दिवसांपूर्वी तिच्या पालकांनी तिचे लग्न एका मदरसा शिक्षकासोबत ठरवले होते आणि त्यासाठी साखरपुड्याचाही कार्यक्रम पार पडला होता.

चंदेरा पोलिस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, २ जून रोजी विष प्राशन केल्यानंतर मुबस्सिराला उपचारासाठी मंगळुरूमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना १० जून रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता तिचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

पंतप्रधानांच्या स्लोव्हाकिया दौऱ्यात स्वागत मीठ-भाकरीने

भारत आता ग्राहक नाही, निर्माताही आहे!

प्रतीक्षा संपली! पहिलं विमान नोएडा विमानतळावर उतरलं

अडखळलेला मान्सून पुन्हा घेणार वेग

पोलीसांच्या प्राथमिक तपासानुसार, मदरसा शिक्षकासोबत झालेल्या साखरपुड्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे. तिच्या मृत्यूनंतर चांदेरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. या घटनेमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी चौकशी केली जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुटुंबीय तसेच या प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींचे जबाब नोंदवले जात आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत मृत्यूमागील कारणांबाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढला जाणार नाही.

Exit mobile version