27 C
Mumbai
Wednesday, September 23, 2026
घरदेश दुनियाभारत-स्लोव्हाकिया संबंधांना ‘व्यापक भागीदारी’चा दर्जा!

भारत-स्लोव्हाकिया संबंधांना ‘व्यापक भागीदारी’चा दर्जा!

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यात सोमवारी (१५ जून) ब्रातिस्लावा येथे द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी विविध क्षेत्रांतील सहकार्य आणि द्विपक्षीय संबंधांवर सविस्तर चर्चा केली. यापूर्वी, स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. त्यानंतर ब्रातिस्लावा येथे त्यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला. पंतप्रधान मोदी रविवारी दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी स्लोव्हाकियात दाखल झाले होते. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यामुळे भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील राजनैतिक, सांस्कृतिक आणि लोकांमधील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशातच नरेंद्र मोदींनी मोठी घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्लोव्हाकियाची राजधानी ब्रातिस्लावा येथे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही देशांच्या संबंधांना नवी दिशा देणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. यावेळी त्यांनी सांगितले की, एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा स्लोव्हाकियाचा हा पहिलाच दौरा असून, या ऐतिहासिक प्रसंगी भारत आणि स्लोव्हाकिया यांनी द्विपक्षीय संबंधांना ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप’ (व्यापक भागीदारी) चा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांचे उबदार स्वागताबद्दल आभार मानले. त्यांनी फिको यांना भारताचा खरा मित्र आणि अनुभवी नेता असे संबोधत भारत-स्लोव्हाकिया संबंधांना नव्या उंचीवर नेण्यात त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. मोदी म्हणाले की, भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील वाढता विश्वास, समान प्राधान्यक्रम आणि भविष्यासाठीची समान दृष्टीकोन ही या नव्या भागीदारीची पायाभरणी आहे. भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार (FTA) अंतिम करण्यासाठी स्लोव्हाकियाने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी विशेष आभार व्यक्त केले आणि हा करार लवकरात लवकर लागू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

तंत्रज्ञान आणि डिजिटल सहकार्याला भविष्यातील भागीदारीचा महत्त्वाचा आधारस्तंभ मानत मोदी म्हणाले की, डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील करारांमुळे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होतील. त्यांनी माहिती दिली की, स्लोव्हाकियातील एका विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावर ‘इंडिया चेअर’ स्थापन करण्यात येत आहे. एआय हे मानवतेच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी साधन बनावे, यासाठी दोन्ही देशांची समान भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. एआयचे भविष्य केवळ नवकल्पनांवर नव्हे, तर विश्वास, जबाबदारी आणि मानवी मूल्यांवर आधारित असावे, असेही त्यांनी सांगितले.

अंतराळ क्षेत्रातील सहकार्याचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, २०१७ मध्ये स्लोव्हाकियाचा पहिला उपग्रह भारताने प्रक्षेपित केला होता. भारताचे अंतराळ क्षेत्र सध्या वेगाने प्रगती करत असून, या विकास प्रवासात सहभागी होण्यासाठी त्यांनी स्लोव्हाकियातील कंपन्यांना आमंत्रित केले. संरक्षण सहकार्याबाबत बोलताना मोदी म्हणाले की, हे दोन्ही देशांमधील दृढ विश्वास आणि धोरणात्मक समन्वयाचे प्रतीक आहे. या क्षेत्रात आज ‘लेटर ऑफ इंटेंट’ वर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून, त्यामुळे संयुक्त विकास, संयुक्त उत्पादन आणि संरक्षण उद्योगांमधील सहकार्याला नवी चालना मिळेल.

हे ही वाचा:

दिव्यांशी सिंग बनणार भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला कमिशन्ड अधिकारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर स्लोव्हाकियन कलाकारांनी गायले ‘वंदेमातरम’

मदरशातील शिक्षकासोबत लग्न ठरल्याने मुलीने संपवले जीवन

अमेरिका इराण करारानंतर सेन्सेक्स, निफ्टीत धमाका

पंतप्रधानांनी दोन्ही देशांतील सांस्कृतिक आणि लोकांमधील संबंधांचेही महत्त्व अधोरेखित केले. भारतातील प्राचीन उपनिषदांचे स्लोव्हाक भाषेत झालेले भाषांतर हे दोन्ही देशांतील सांस्कृतिक जवळिकीचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्लोव्हाकियात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांचे कौतुक करताना त्यांनी म्हटले की, तेथील अर्थव्यवस्था आणि समाजाच्या विकासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील ही नवी व्यापक भागीदारी व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण, अंतराळ, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्याला नवी उंची देईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा