25 C
Mumbai
Wednesday, October 9, 2024
घरक्राईमनामाकिशोरी पेडणेकर यांना अटक होणार? आर्थिक गुन्हे शाखेने ११ तारखेला बोलावले

किशोरी पेडणेकर यांना अटक होणार? आर्थिक गुन्हे शाखेने ११ तारखेला बोलावले

कोरोना काळात बॉडी बॅग खरेदीत झाला होता घोटाळा

Google News Follow

Related

कोव्हिडं काळात झालेल्या बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष तपास पथकाने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठवले आहे. पेडणेकर यांना ११ सप्टेंबर रोजी आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणात पेडणेकर यांना अटक करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

कोव्हिडं काळात बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह वेदांत इन्फोटेक कंपनीच्या कंत्राटदार आणि एका माजी मनपा आयुक्त यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी पेडणेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती, २९ ऑगस्ट रोजी न्यायालयाने किशोरी पेडणेकर यांचा जामीन अर्ज फेटाळून लावत बुधवार पर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई न करण्याच्या आदेश दिला होता.

हे ही वाचा:

राष्ट्रपतींच्या जी २० निमंत्रणाआधी ‘भारत’ नाव ब्रिक्सच्या अधिसूचनेतही

सनातन धर्माबद्दल टिप्पणी प्रकरणी उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गेंविरोधात गुन्हा

सोमय्या प्रकरणी ‘लोकशाही’चे कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा

आदीत्य ठाकरे आता स्टॅलिनलाही मिठी मारा…

दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी पेडणेकर यांना समन्स पाठवून ११ सप्टेंबर (सोमवार) रोजी तपास कामी चौकशीला हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलविण्यात आल्यामुळे पेडणेकर यांना अटक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 

४ ऑगस्ट रोजी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे,आर्थिक गुन्हे शाखेने पेडणेकर, माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) आणि माजी महापालिका उपआयुक्त (खरेदी),खाजगी कंत्राटदार वेदांत इनोटेक यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला होता. वेदांत इन्फोटेक यांनी कथितपणे मुंबई महानगरपालिकेला ६ हजार ७१९ रुपये प्रति बॉडी बॅग पुरवल्या होत्या, जे त्याच कालावधीत इतर सरकारी अधिकारी किंवा खाजगी रुग्णालयांकडून आकारल्या गेलेल्या तिप्पट (प्रत्येकी १५०० रुपये) जास्त होत्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा