25 C
Mumbai
Sunday, February 1, 2026
घरक्राईमनामासाकिनाक्यात ‘आई-बाबा फाऊंडेशन’च्या नावाखाली खंडणी

साकिनाक्यात ‘आई-बाबा फाऊंडेशन’च्या नावाखाली खंडणी

दहशत माजवणारा योगेश मौर्या जेरबंद

Google News Follow

Related

साकिनाका परिसरातील एका किराणा व्यावसायिकाकडून कोट्यवधींची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या तथाकथित सामाजिक संस्थेचा बुरखा फाडत गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने आई-बाबा फाऊंडेशनचा संस्थापक योगेश रमेश मौर्या याला अटक केली आहे. शुक्रवारी पाच लाखांचा हप्ता स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले असून शनिवारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

परिसरातील व्यावसायिकांमध्ये योगेशची प्रचंड दहशत होती. १२० जणांची टोळी असून त्यात काही पत्रकार असल्याचा दावा करत तो व्यावसायिकांना धमकावत असे. पैसे दिले नाहीत तर खोट्या गुन्ह्यांत अडकवण्यासह जिवे मारण्याच्या धमक्या देत त्याने साकिनाका परिसरात खंडणीचे जाळे पसरवले होते.

या प्रकरणातील तक्रारदार मयुर दौलत भंडलकर हा साकिनाक्यातील उमिया स्टोअर्स या किराणा दुकानात गेल्या चार वर्षांपासून मालवाहतुकीचे काम करतो. ऑक्टोबर महिन्यात डिलिव्हरीसाठी जात असताना योगेशने त्याला अडवून गाडीत चोरीचा माल असल्याचा बनाव केला. रेशनिंगचा माल विक्रीचा खोटा गुन्हा दाखल करून अटक करण्याची धमकी देत, ‘माझी मोठी टोळी आहे’ असा दबाव टाकला. पैसे न दिल्यास गाडीसमोर ढकलून ठार मारण्याचीही धमकी देण्यात आली.

हे ही वाचा:

“आसामच्या लोकसंख्येत बदल; सात जिल्ह्यांमध्ये ६४ लाख घुसखोर!”

चांदीच्या किंमती एका दिवसात १ लाखांनी घसरल्या! सोन्याची काय परिस्थिती?

दिल्ली स्फोटप्रकरणातून नवी माहिती, यहुदी कॉफी चेनला करायचे होते लक्ष्य

पाकिस्तानी कनेक्शन असलेल्या नार्को-नेटवर्कचा भांडाफोड

यानंतर दुकानमालक प्रविण गामी यांची योगेशशी भेट झाली. त्या वेळी पाच लाख रुपये खंडणी आणि दरमहा पन्नास हजारांचा हप्ता देण्याची मागणी करण्यात आली. जिवाच्या भीतीने गामी यांनी सुरुवातीला पाच लाख रुपये दिले. त्यानंतर योगेश व त्याचे सहकारी गाडी अडवून वारंवार पैशांची मागणी करू लागले. आतापर्यंत साडेबारा लाख रुपये खंडणी उकळल्याचे तपासात उघड झाले आहे.

२३ जानेवारी रोजी पुन्हा पाच लाखांची मागणी झाल्यानंतर अखेर प्रविण गामी व मयुर भंडलकर यांनी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी सापळा रचत साकिनाका येथे हप्ता घेताना योगेशला अटक केली. तपासात व्यावसायिकांची माहिती राजन सिंग ऊर्फ बटला आणि मनोज गुप्ता यांच्याकडून मिळत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे. अन्य आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा