26 C
Mumbai
Friday, January 30, 2026
घरक्राईमनामाअमित शाह, अजित डोभाल यांच्या नावे केले बनावट कॉन्फरन्स कॉल आणि...

अमित शाह, अजित डोभाल यांच्या नावे केले बनावट कॉन्फरन्स कॉल आणि…

माजी बँक कर्मचाऱ्याची कोट्यवधींची फसवणूक

Google News Follow

Related

निवृत्त बँक कर्मचाऱ्याची त्याच्याचं नातेवाईकाकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. नातेवाईकाने स्वतःला गुप्तचर अधिकारी म्हणून समोर आणले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रातील इतर उच्च अधिकाऱ्यांसोबत कॉन्फरन्स कॉल करून निवृत्त बँक कर्मचाऱ्याची फसवणूक केली आहे.

माहितीनुसार, ५३ वर्षीय पीडित सूर्यकांत थोरात यांना २०१९ मध्ये त्यांच्या नातेवाईकाने संपर्क साधून कळवले की त्यांचा मुलगा केंद्र सरकारच्या गुप्तचर विभागात काम करतो आणि त्यांनी एका विशेष मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यानंतर त्यांनी दावा केला की केंद्र सरकार त्यांना या कामासाठी ३८ कोटी रुपये बक्षीस देईल, परंतु त्यांना प्रक्रिया शुल्क, वकिलाचे शुल्क आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटवस्तूंसाठी पैसे द्यावे लागतील. पैसे दिल्यानंतर लगेच पैसे परत केले जातील असे आश्वासनही नातेवाईकाने सूर्यकांत यांना दिले.

यानंतर सुर्यकांत यांचा विश्वास संपादन करण्यासाठी, आरोपी सूर्यकांत यांना फोन करायचा आणि अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि इतर उच्च अधिकाऱ्यांशी कॉन्फरन्स कॉल्स करण्याचे नाटक करायचा. यावर विश्वास ठेवून, सूर्यकांत यांनी २०२० ते २०२४ दरम्यान विविध बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये दिले. सुर्यकांत यांनी ही रक्कम उभी करण्यासाठी त्यांच्या काही ओळखीच्या लोकांकडूनही उधार घेतले होते.

सुर्यकांत म्हणाले की, नातेवाईकाने त्यांच्या मुलाचे ओळखपत्र, रिव्हॉल्व्हर, बँकेचा संदेश दाखवला त्यामुळे आम्हाला त्याच्यावर कधीही अविश्वास वाटला नाही. त्याचे कुटुंब आम्हाला सांगायचे की तो प्रशिक्षणासाठी जातो, म्हणून तो कधीही घरी नसायचा. त्यामुळे ते खरे वाटले. जानेवारी २०२० ते सप्टेंबर २०२४ दरम्यान, मी त्याच्या मालकीच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये चार कोटी रुपयांहून अधिक रक्कम ट्रान्सफर केली. मी माझे फ्लॅट, शेती, दुकान, कार आणि पत्नीचे दागिने विकले. जेव्हा ते पुरेसे नव्हते, तेव्हा मी माझ्या पीएफमधून पैसे दिले, असे सुर्यकांत यांनी सांगितले. त्यांनी मला अमित शहा, अजित डोवाल आणि इतर अधिकाऱ्यांशी बोलायला लावले. त्यांनी कॉन्फरन्स कॉलवर मला आश्वासन दिले की बक्षीस संबंधित काम लवकरच पूर्ण होईल आणि काळजी करू नका. नंतर कळले की असे अधिकारी कॉलवर बोलू शकत नाहीत.

हेही वाचा..

एआय मागणी पूर्ण करण्यासाठी २ ट्रिलियन डॉलर्सच्या उत्पन्नाची गरज

भगवान हनुमान पुतळ्यावरील टिप्पणीमुळे अमेरिकन रिपब्लिकन नेता टीकेचा धनी; प्रकरण काय?

गिरिराज सिंह यांचा तेजस्वी यादावांवर हल्लाबोल

रांचीतील जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीची धाड

जेव्हा सूर्यकांत यांनी त्यांच्या नातेवाईकाला पैसे परत करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांचा मुलगा परदेशात एका महत्त्वाच्या मोहिमेवर आहे. काही महिन्यांनंतर, सुर्यकांत यांच्या लक्षात आले की, ही संपूर्ण घटना बनावट आहे आणि त्यांनी तक्रार दाखल केली.

पोलिसांनी शुभम सुनील प्रभाळे, सुनील बबनराव प्रभाळे, ओंकार सुनील प्रभाळे, प्रशांत राजेंद्र प्रभाळे आणि भाग्यश्री सुनील प्रभाळे अशी ओळख पटवलेल्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा