29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरक्राईमनामाचित्रपट निर्माता कमल मिश्राने पत्नीला चिरडले

चित्रपट निर्माता कमल मिश्राने पत्नीला चिरडले

कमल मिश्रा यांच्या पत्नीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली

Google News Follow

Related

काही दिवसापूर्वी चित्रपट निर्माते कमल मिश्रा यांनी पत्नीला कारने धडक देऊन पळ काढला होता. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार केली होती. अंधेरी येथील आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मिश्रा यांचा शोध सुरू आहे.

बुधवार, १९ ऑक्टोबर रोजी कमल मिश्रा यांनी त्यांच्या पत्नी यास्मिन मिश्रा यांना कारने धडक दिली होती. या कार धडकेत त्यांच्या पत्नी जबर जखमी झाल्या होत्या. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. यानंतर यास्मिन यांनी पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी या घटनेविरोधात पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कमल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

यास्मिन मिश्रा यांच्या तक्रारीनुसार, १९ ऑक्टोबरला त्यांनी आपल्या पतीला एक दुसऱ्या महिलेसोबत गाडीतून जाताना पाहिले. दोघांना कारमध्ये एकत्र पाहून कमल यांच्या पत्नीने कारची काच ठोठावली. मात्र, कमल यांनी यास्मिन यांच्याकडे दुर्लक्ष करत गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या पत्नीने गाडी थांबण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी गाडीने थेट यास्मिन यांना धडक दिली. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या डोक्याला मार लागला आहे.

आंबोली पोलिसांनी कमल यांच्याविरुद्ध भादंवि कलम २७९ आणि ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी कमल मिश्रा यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा