28.8 C
Mumbai
Friday, May 1, 2026
घरक्राईमनामामिरारोड प्रकरणात एफआयआर आला समोर; हिंदू हो क्या विचारत केला हल्ला!

मिरारोड प्रकरणात एफआयआर आला समोर; हिंदू हो क्या विचारत केला हल्ला!

सुरक्षा रक्षकाने केली होती तक्रार

Google News Follow

Related

मिरा रोड मध्ये एका विकृत जिहादीने दोन सुरक्षा रक्षकांवर हल्ला केल्याची घटना घडली. धर्म विचारून या विकृताने त्या सुरक्षा रक्षकांवर चाकूने हल्ला केला. या संदर्भात नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुब्रोतो सेन यांनी ही तक्रार केली आहे.

त्या एफआयआर मध्ये सगळा प्रसंग स्पष्ट करण्यात आला आहे. हा एफआयआर असा-

मी सब्रोतो रमेश सेन, वय ३१ वर्षे, व्यवसाय सुरक्षा रक्षक व डान्स टिचर रा. तवळ, मिरारोड पुर्व ता.जि. ठाणे. मी नोव्हेबर २०२५ पासुन भाड्याने राहणेस असुन श्रीराम इंटरनॅशलन स्कुल, काशिमिरा येथे डांन्स शिक्षण म्हणुन २ वर्षापासुन नोकरी करतो व त्यासोबत अमन सिक्युरिटी इंडिया प्रा. लि. यां एजन्सी मार्फत मी सुरक्षा रक्षक म्हणून असलेल्या ईमारतीवर २८ मार्च २०२६ पासुन नोकरी करीत आहे.

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवर माझ्या सह एजन्सी मार्फत रात्री सुपरवायझर राजकेशर मिश्रा सह एकूण ५ सुरक्षा रक्षक नेमलेले असतात. २६ एप्रिलला या बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणुन रात्रौ ८ वा. चे सुमारास कामावर हजर झालो. त्याचवेळी माझ्यासह माझे सुपरवायझर राजकेशर मिश्रा तसेच सुरक्षा रक्षक हरि सिंग, अजय शुक्ला, मनोज कुमार हे देखील कामावर हजर झाले. मला बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर काम देण्यात आले होते. तसेच मेन गेटच्या रोडवर हरी सिंग यांना कर्तव्य देण्यात आले होते.

हे ही वाचा:

“महिला आरक्षणाचे लक्ष्य मी पूर्ण करूनच राहीन…

गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची बाजी

प.बंगाल निवडणुकीच्या धुमश्चक्रीत राहुल गांधी अचानक निकोबार भेट

अमेरिका–इराण तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमतीत २% उसळी

२७ एप्रिलला  रोजी रात्रौ ३ वाजता एक अनोळखी इसम माझ्याजवळ आला व त्याने मला विचारले की, ‘आगे मस्जीद है क्या ? मी त्यास हां आगे दाहीनी तरफ एक मस्जीद है’,असे सांगीतले.” त्यावर त्याने मला मस्जीद का नाम क्या है? असे विचारले. त्यास मी मुझे नाम पता नही असे सांगितले. त्यावर परत त्याने मला ‘हिंदू हो क्या ?’ असे विचारले. त्यावर मी त्यास हो असे सांगितले. त्यानंतर तो इसम माझे येथून निघून गेला. पंरतु तो रस्त्यावर फिरत असल्याचे मी पाहिले. पहाटे ४ वाजता  मी रसाज सिनेमाजवळ असलेल्या ईराणी चहा वाल्याकडे चहा पिण्यासाठी गेलो. त्यावेळी मला प्रश्न विचाणारा व्यक्ती देखील त्याठिकाणी दिसुन आला. मी चहा पिऊन माझे कर्तव्याच्या ठिकाणी ४.३० वाचे सुमारास परत आलो.

त्याचदरम्यान मला प्रश्न विचारणारा इसम माझ्या बाजुने आला व ‘हिंदू हो ना’ असे म्हणुन माझा उजवा हात पकडुन त्याच्या हातातील चाकुने माझ्यावर वार केला. मी तो वार चुकविण्याचा प्रयत्न केला असता तो चाकु माझे पाठीवर लागला. मी कसाबसा त्याचे तावडीतुन निसटलो व सुपरवायझरच्या कॅबिनच्या दिशेन पळत सुटलो व मुख्य लोंखडी प्रवेशद्वाराच्या आतमध्ये जावुन सुपरवायझर याचे कॅबिनमध्ये गेलो. ते कॅबिनमध्ये खुर्चीवर बसलेले होते. त्यांना मी घडलेला प्रकार सांगत असताना त्याठिकाणी माझेवर वार करणारा इसम त्या ठिकाणी पोहचला.

त्याने सुपरवायझर मिश्रा यांना देखील ‘तु भी हिंदु है ना, अगर नहीं है तो कलमा पढ़’ असे बोलु लागला. त्यावेळी मिश्रा यांना कलमा पढता न आल्याने त्याचेवर चाकुने हल्ला केला मी घाबरून त्या ठिकाणावरून पळुन गेलो व बिल्डींगच्या पाठीमागे जावुन लपुन राहिलो. जवळपास ५ ते ७ मिनिटे उलटल्यावर काहीच हालचाल दिसुन न आल्याने मी मिश्रा सरांना कॉल केला. त्यावेळी मिश्रासर मला रडत सांगत होते की, मे मर जाऊंगा, मे मर जाऊंगा.

मी त्यानंतर सुपरवायझर केबिनच्या येथे आलो असता, तेथे हरी सिंग यांच्यासोबत दोन इसम हजर होते. त्यावेळी हरीसिंग याचेकडुन मला समजले की, माझ्यावर हल्ला करणाऱ्या इसमाने मिश्रा सरांवर त्यांचा धर्म विचारून हल्ला केला असल्याने त्यांना उपचाराकरीता दवाखान्यात नेण्यात आले आहे. त्यानंतर मी नयानगर पोलीस ठाण्यात आलो. मी जखमी असल्याने पोलीसांनी मला भाईंदर येथे सरकारी दवाखान्यात नेले. माझ्यावर औषधोपचार झाल्यानंतर मी तक्रार देण्यासाठी मी नयानगर पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यास परत आलो. मी त्या अनोळखी इसमास पुन्हा पाहिल्यास ओळखु शकेन.

3

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा