उत्तर प्रदेशमध्ये हिंदू मुलाचे धर्मांतर करून लग्न लावण्याप्रकरणी मौलवीसह पाच जणांना अटक!

पोलिसांकडून अधिक तपास सुरु 

उत्तर प्रदेशमध्ये हिंदू मुलाचे धर्मांतर करून लग्न लावण्याप्रकरणी मौलवीसह पाच जणांना अटक!

उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील धामपूरमध्ये एका हिंदू मुलाला जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारून त्याचे लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिडीत मुलाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी उत्तर प्रदेश बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक अध्यादेश, २०२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि मौलावीसह पाच जणांना अटक केली.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) धरम सिंह मार्शल म्हणाले की, अटक केलेल्यांमध्ये पाच जणांचा समावेश आहे, ज्यामध्ये एक मौलवी आणि एक महिला आहे. या सर्वांवर एका हिंदू मुलाचे धर्म परिवर्तन करून त्याचे लग्न लावून दिल्याचा आरोप आहे. या संदर्भात, पुराणा धामपूर येथील रहिवासी जसवंत सिंग यांनी रविवारी (९ फेब्रुवारी) तक्रार दाखल केली.

हे ही वाचा : 

दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्का निधी

निलेश राणेंनी इशारा देताच, पोलिसांनी मुस्लिमाची अनधिकृत चहाची टपरी हटवली!

राजस्थानच्या अजमेरमधून ८ बांगलादेशींना अटक!

मुंबई हल्ल्यासारख्या पाकिस्तानने दिलेल्या जखमा विसरता येणार नाहीत

जसवंत सिंग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुकुल सिंग नावाच्या मुलाचे एका मुस्लिम मुलीशी प्रेमसंबंध होते. शनिवारी (८ फेब्रुवारी) रात्री मुस्लीम मुलीने तिचे वडील शाहिद, आई रुखसाना, मौलवी मौलाना इरशाद आणि मौलाना गुफरान यांनी मिळून मुलगा मुकुल सिंगला मदरशात घेवून गेले. तेथे त्यांनी त्याचे धर्मांतर करत त्याला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. त्यानंतर मुस्लीम मुलीशी त्याचे लग्न लावून दिले.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मौलाना इर्शाद, मौलाना गुफरान, सायमा आणि तिच्या पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, पिडीत मुलाला त्याच्या कुटुंबीयांकडे स्वाधीन करण्यात आले आहे.

Exit mobile version