राजस्थानच्या अजमेरमधून ८ बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. अजमेरमधील दरगाह बाजार मधून घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. दरगाह पोलीस स्टेशनच्या स्पेशल टास्क फोर्सने ही कारवाई केली. दरम्यान, यापूर्वी कारवाई करत अजमेरमधून चार घुसखोर बांगलादेशींना अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या दोन बांगलादेशींना १२ वर्षांपूर्वीच भारतातून हाकलून देण्यात आले होते. बेकायदेशीर मार्गाने त्यांनी पुन्हा भारतात शिरकाव केला आणि अजमेरमध्ये स्थायिक झाले. पोलिसांच्या शोधमोहिमेदरम्यान हा संपूर्ण खुलासा झाला. पोलिसांनी दोघांना अटक करून पुढील कारवाई सुरु केली आहे.
अजमेरच्या दरगाह बाजार मधून अटक करण्यात आलेली आठ जणांची ही टोळी भिक मागण्याचे काम करीत होती. पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली की, घुसखोरांवर कारवाई करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. पोलीस आणि सुरक्षा एजन्सीची मदत घेवून घुसखोरांवर कारवाई केली जात आहे.
हे ही वाचा :
मुंबई हल्ल्यासारख्या पाकिस्तानने दिलेल्या जखमा विसरता येणार नाहीत
इंडी आघाडीला ठेंगा; २०२६ च्या निवडणुकीसाठी ममतांचा एकला चलोचा नारा
ट्रम्प यांचा हमासला अल्टिमेटम; शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व ओलिसांना सोडा अन्यथा…
‘एअरो इंडिया २०२५’ च्या प्रदर्शनात पहिल्यांदाच अमेरिका-रशियाच्या लढाऊ विमानांचा समावेश!
परदेशातून भारतात आलेले आणि पुन्हा परदेशात जाताना नोंदी आहेत कि नाहीत, अशाही लोकांची चौकशी सुरु आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, भारतासह अनेक राज्यातून घुसखोर बांगलादेशींना अटक केली आहे, करत आहेत. राज्यातही नुकतेच १६ बांगलादेशींना अटक करण्यात आली होती. मानखुर्द, कल्याण, पनवेल, मुंब्रा अशा विविध ठिकाणांवरून अटक केली होती.