सिंधुदुर्गात दोन दिवसापूर्वी एका पर्यटकाला कुडाळमधील झाराप झिरो पॉईंट येथे मारहाण झाल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे आता आक्रमक झाले आणि त्यांनी व्हिडीओ ट्वीटकरत हिंदू बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केले. तसेच हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी करत पोलिसांना इशारा दिला होता.
पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच कारवाई करत त्यांनी चहाच्या टपरी मालकाला अटक केली. तनवीर करामत शेखला असे अटक केलेल्याचे नाव आहे. यासह अनधिकृत असलेली चहाची टपरी देखील हटवण्यात आली. या प्रकरणातील चार आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.
पर्यटकांना मारहाण प्रकरणी निलेश राणे यांनी १२ फेब्रुवारी रोजी हिंदू बांधवाना एकत्र होण्याचे आवाहन केले होते. या प्रकरणी पोलिसांना कारवाई करण्याची मागणी करत अनधिकृत असलेली चहाची टपरी हटवून टाकण्याचा इशाराही दिला होता. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती माझी जबाबदारी नसेल, असे निलेश राणे म्हणाले होते. दरम्यान, निलेश राणे यांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी कारवाई करत बेकायदेशीर चहाची टपरी हटवली आणि एकाला अटक केली. फरार हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फरार आरोपी तनवीर करामत शेख याच्याकडे कामाला असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा :
राजस्थानच्या अजमेरमधून ८ बांगलादेशींना अटक!
मुंबई हल्ल्यासारख्या पाकिस्तानने दिलेल्या जखमा विसरता येणार नाहीत
इंडी आघाडीला ठेंगा; २०२६ च्या निवडणुकीसाठी ममतांचा एकला चलोचा नारा
ट्रम्प यांचा हमासला अल्टिमेटम; शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व ओलिसांना सोडा अन्यथा…
काय आहे प्रकरण?
मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ झाराप झिरो पॉईंट येथे चहा पिण्यासाठी काही पर्यटक एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी चहाच्या कपात माशी पडल्याचे पर्यटकाने त्या हॉटेल मालकाला सांगितले. या क्षुल्लक गोष्टीचे रुपांतर वादावादीत होऊन हॉटेल मालकासह अन्य ५-६ जणांनी त्या पर्यटकाला बेदम मारहाण केली. तन्वीर करामत शेख, शराफत अब्बास शेख, अब्बास उर्फ साहिल शराफत शेख, परवीन शराफत शेख, साजमीन शराफत शेख आणि तलाह करामत शेख अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत.