27.7 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरक्राईमनामामाजी NIA प्रमुखांच्या नावाने ७५ वर्षीय वृद्धाला १६.५ लाखांचा गंडा

माजी NIA प्रमुखांच्या नावाने ७५ वर्षीय वृद्धाला १६.५ लाखांचा गंडा

अंधेरीतील धक्कादायक प्रकार

Google News Follow

मुंबई: मुंबईतील अंधेरी परिसरात एका ७५ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला सायबर भामट्यांनी आपले जाळे फेकून तब्बल १६.५ लाख रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, आरोपीने चक्क राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) माजी प्रमुख सदानंद दाते असल्याचे भासवून या वृद्धाला दिल्ली बॉम्बस्फोट आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवण्याची भीती घातली होती.

तक्रारदार हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) निवृत्त मुकादम आहेत. ११ डिसेंबर २०२५ रोजी त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. समोरच्या व्यक्तीने आपण दिल्ली एटीएसमधून (Anti-Terrorism Squad) बोलत असल्याचे सांगितले. “तुमचा संबंध दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाशी असून तुमचा मोबाईल नंबर एका संशयास्पद ७ कोटींच्या व्यवहाराशी जोडलेला आहे,” असे सांगून वृद्धाला घाबरवण्यात आले.
हे ही वाचा:
काजा कालास भारत दौऱ्यावर

भारतावर अमेरिकेने लादलेले टॅरिफ अर्ध्यावर येण्याचे संकेत

बँक पासवर्डचा गैरवापर,माजी कर्मचाऱ्याने ८.६९ कोटींचा अपहार

पाकिस्तानमध्ये लग्नसमारंभात आत्मघाती स्फोट

तपासाचे नाव सांगून आरोपीने वृद्धाला ‘सिग्नल’ (Signal) ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. तिथे “ATD” नावाच्या आयडीवरून व्हिडिओ कॉल करून समोरच्या व्यक्तीने स्वतःची ओळख माजी NIA प्रमुख सदानंद दाते अशी करून दिली. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने एक बनावट अटक वॉरंट देखील पाठवले. “तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या जिवाला दहशतवाद्यांपासून धोका आहे, त्यामुळे हा तपास गुप्त ठेवावा लागेल,” अशी तंबीही त्याला देण्यात आली.
आरबीआय पडताळणीच्या नावाखाली लूट
तुमच्या बँक खात्याची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे (RBI) पडताळणी करावी लागेल, असे सांगून आरोपीने वृद्धाला त्याच्या खात्यातील सर्व पैसे एका विशिष्ट बँक खात्यात वळवण्यास सांगितले. अटकेच्या भीतीने आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी वृद्धाने १६.५ लाख रुपये ट्रान्सफर केले. पैसे मिळाल्यावर आरोपीने संपर्क तोडून वृद्धाला ब्लॉक केले, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी पश्चिम विभाग सायबर सेल पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ज्या बँक खात्यात पैसे जमा झाले, त्याचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा