34 C
Mumbai
Thursday, February 12, 2026
घरक्राईमनामाकोणत्या रागातून पत्नीने केले पतीच्या शरीराचे तुकडे?

कोणत्या रागातून पत्नीने केले पतीच्या शरीराचे तुकडे?

दारुड्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून पत्नीनेच केली पतीची हत्या.

Google News Follow

Related

पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना हिंगणघाट फैल येथे घडली आहे. हत्या केल्यानंतर हात-पाय तोडून शरीर जाळले. पण शीर पूर्ण जळले नाही म्हणून रेल्वे परिसरात फेकून दिले.

या घटनेने वर्धा जिल्ह्यात एकच धक्कादायक खुनाचा प्रकार समोर आला, आरोपी पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अनिल मधुकर बेंदले वय ४६ असा मृतकाचं नाव आहे तर मनीषा बेंदले असं आरोपी पत्नीचं नाव आहे.

मृतक हा मलकापूर बोदड येथील रहिवासी असून, काही महिन्यांपासून तो पुलगाव येथे राहत होता. मृतकाचे वृद्ध वडील हे अजूनही मलकापूर येथे वास्तव्यास आहेत. मृतक गृहरक्षक दलात (होमगार्ड) येथे काम करत होता. पण आंदोलनात सहभाग घेतल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर रोज मजुरी करत असे, रोजंदारीच्या पैशातून दारू पिवून पत्नीशी वाद घालून भांडण करत असे. मृतकाचा मोठा मुलगा दहावीत शिकत असून दुसरा मुलगा सहा वर्षाचा आहे. अखेर दररोजच्या त्रासापासून सुटका मिळवण्याचे ठरवत रागाचा भरात पत्नीने त्याचा गळा आवळून हत्या केली.

अनिलची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून २ बॅगेत भरले आणि मुलाला दोनशे रुपये देऊन ऑटो भाड्याने करायला सांगितले. ऑटोने मृतदेह १० किलोमीटर अंतरावर असलेल्या मलकापूर बोधड या मूळ गावामध्ये आणून घराचा मोठ्या परिसर असल्यामुळे तिथे जाळला. सासर्‍याने बॅगमध्ये काय आहे असे विचारले असता ‘जुने कपडे जाळायला आणले’ आहेत असे मनीषाने सांगितले. पुलगाव पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला असून मृतकाची पत्नी मनीषा आणि मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

हे ही वाचा:

यंदा टपाल विभागात राख्यांसाठी २० हजार लिफाफे गेले घरोघरी

जेवणाचा डबा घेऊन परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

परवानगी घ्या मग संजय राऊत यांना भेटा!

आमिर खानने ‘तिला’ का सॅल्यूट केला नाही?

दोन दिवसांपूर्वी एक मुंडके पुलगावातील रेल्वे स्टेशनच्या बाजूला एका झुडपात मिळाले होते. तेव्हा संपूर्ण हत्येच्या प्रकरणाचा उलगडा करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. मनीषाच्या जबाबात विसंगती आढळून आल्याने पोलिसांची शंका बळावली आणि हत्येचे बिंग फुटले. पोलिसांनी मृतकाच्या शरीराचे अवशेष ताब्यात घेऊन फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहे. या हत्याकांडाने जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली असून इतक्या क्रूरपणे पत्नी पतीची हत्या कशी करू शकते ? अशी चर्चा रंगत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा