36 C
Mumbai
Tuesday, October 13, 2026
घरक्राईमनामाघाटकोपरमध्ये गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाची चाकू भोसकून हत्या

घाटकोपरमध्ये गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाची चाकू भोसकून हत्या

कामराज नगरमधील धक्कादायक घटना

Google News Follow

Related

मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील कामराज नगर परिसरात गणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट लागणारी धक्कादायक घटना घडली. ‘सेव्हन स्टार स्पोर्ट्स क्लब’ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेश राजेंद्रन देवेंदर (३५) यांची भररस्त्यात धारदार चाकूने छातीत वार करून हत्या करण्यात आली. कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून तसेच जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेत आनंद तिवारी हा तरुणही जखमी झाला असून, पंतनगर पोलिसांनी मुख्य संशयितासह सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बीएमसी शाळेजवळील गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता विनय शर्मा याला रौनक बाळू सोनावणे याने मारहाण केली. ही माहिती मिळताच मंडळाचे अध्यक्ष राजेश देवेंदर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रौनकला जाब विचारला. वाद वाढू नये म्हणून उपस्थितांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत केली. मात्र, त्यानंतर रौनकने फोन करून आकाश सोनावणे, अक्षय सोनावणे, अश्विन उनवणे, श्रेयस, बबलू आणि स्टीफन नाडर उर्फ अण्णा यांना घटनास्थळी बोलावून घेतल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या सर्वांनी राजेश यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर आकाश आणि अक्षय यांनी राजेश यांना पकडले, तर अश्विनने त्यांना मागून आवळून धरल्याचा आरोप आहे. याचवेळी रौनकने धारदार चाकू काढून राजेश यांच्या डाव्या छातीत वार केला.
हे ही वाचा:
‘नाममात्र शुल्काला विरोध नको’

राहुल गांधींना डोवाल यांची सुपारी मिळाली आहे काय?

परदेशी गुंतवणूकदारांची पुन्हा माघार

साखरेचे मिल भाव २५ टक्क्यांनी घसरून सुद्धा ग्राहकांना दिलासा नाही

चाकूच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले राजेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. आरोपी घटनास्थळावरून पळून जात असताना त्यांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आनंद तिवारी याच्यावरही रौनकने चाकूने वार केला. जखमी राजेश यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना घाटकोपरमधील खासगी रुग्णालयात नेले, तेथेही डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी रौनक सोनावणे, आकाश सोनावणे, अक्षय सोनावणे, अश्विन उनवणे, श्रेयस, बबलू आणि स्टीफन नाडर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१)सह बेकायदेशीर जमाव आणि इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. घटनेनंतर कामराज नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा