31 C
Mumbai
Wednesday, November 11, 2026
घरक्राईमनामाकुर्ल्यात भाऊबीजेच्या दिवशीच दुसऱ्या भावाची हत्या

कुर्ल्यात भाऊबीजेच्या दिवशीच दुसऱ्या भावाची हत्या

पूर्ववैमनस्यातून गँगवॉर भडकल्याची भीती

Google News Follow

भाऊबीजेचा सण सुरू असतानाच कुर्ला पश्चिम येथील माकडवाला कंपाउंड परिसरात गोळीबाराचा थरार उडाला. अवघ्या सहा महिन्यांच्या अंतराने पवार कुटुंबातील दुसऱ्या भावाची भरदिवसा गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण उपनगरात प्रचंड खळबळ उडाली आहे. विनोद पवार (वय ३३) असे मृताचे नाव असून, जुन्या वैमनस्यातून आणि बदल्याच्या भावनेतून ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

कुर्ला पश्चिमेकडील हलाव पूल, माकडवाला कंपाउंड येथे राहणारा विनोद पवार मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तो हलाव पूल परिसरातील सार्वजनिक शौचालयातून बाहेर पडत होता. त्याच वेळी एका मोटारसायकलवरून आलेल्या तीन हल्लेखोरांपैकी एकाने विनोदवर अत्यंत जवळून पिस्तुलातून सलग चार ते पाच राऊंड झाडले आणि हल्लेखोर दुचाकीवरून सुसाट पसार झाले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विनोदला स्थानिक नागरिकांनी तातडीने कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला सायन रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. सायन रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच विनोबा भावे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले.

हे ही वाचा:

मदर डेअरी, ‘अमूल’ दूध महागले

अर्शदीप सिंगने अभिनेत्री समरीन कौरसोबत उरकला साखरपुडा

मराठीत याला ढुंकूनही न बघणे म्हणतात…

वैदिक मंत्रोच्चारात केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद

सहा महिन्यांपूर्वी मोठ्या भावाचाही असाच अंत…..

विनोद पवार हा २०१९ मधील ‘बिल्ला पवार हत्या प्रकरणा’तील संशयित आरोपी होता आणि सध्या तो जामिनावर बाहेर होता. या हत्येचे धागेदोरे जुन्या गँगवॉरशी जोडलेले असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी २९ एप्रिल रोजी विनोदचा मोठा भाऊ बाबा पवार याचीही याच परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा पवार हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना गजाआड केले होते. त्यातील एका आरोपीच्या मुलाचा विनोदच्या हत्येत थेट सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.

आरोपींच्या शोधासाठी नऊ पथके रवाना…

विनोबा भावे नगर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी गुन्हे शाखेची तीन आणि पूर्व प्रादेशिक विभागातील विविध पोलिस ठाण्यांची सहा अशी एकूण नऊ विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली असून अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत.

‘फाशी द्या, तरच मृतदेह स्वीकारू’

सहा महिन्यांत घरातील दोघांचा बळी गेल्याने संतप्त आणि शोकाकूल नातेवाईकांनी विनोबा भावे नगर पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. आरोपींना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून माकडवाला कंपाउंड आणि पोलिस ठाण्याच्या परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा