27.9 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरक्राईमनामामाहीम समुद्रकिनारी झालेल्या हत्येमागे 'गे अँगल'!

माहीम समुद्रकिनारी झालेल्या हत्येमागे ‘गे अँगल’!

Google News Follow

Related

समुद्र किनारी बसलेल्या प्रेमीयुगलांवर झालेला हल्ला हा गे-अँगलतमधून झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला असून त्याची प्रेयसी जखमी आहे. सध्या तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन हल्लेखोरांपैकी एकाला नागपूर येथून पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समजते. मात्र माहीम पोलिसांनी अद्याप याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

माहीम येथील समुद्र किनारी बसलेल्या एका प्रेमीयुगलांवर मंगळवारी मध्यरात्री जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात मोहम्मद वसीम याचा मृत्यू झाला होता तर त्याची प्रेयसी ही गंभीररीत्या जखमी झाली होती. याप्रकरणी माहीम पोलिसांनी बुधवारी हत्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला असता मृत तरुण आणि जखमी तरुणी हे गोवंडी शिवाजी नगर परिसरात राहणारे असून हे दोघे मंगळवारी रात्री माहीम दर्गा येथे आले होते. त्यानंतर दोघे माहीमच्या समुद्र किनारी बसलेले असताना मद्यरात्री दोन तरुण त्या ठिकाणी आले व त्यांनी या दोघांवर शस्त्राने सपासप वार करून पळून गेले. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला होता तर प्रेयसी जखमी झाली होती.

हे ही वाचा:

धावत्या मोटारीच्या बोनेटवर बसून स्टंट करणाऱ्या तरुणांचा माज खाली उतरवला

गलवान खोऱ्यातील संघर्षात चीनचे ३८ जवान नदीत वाहून गेल्याचे उघड

मालेगाव प्रकरणातील साक्षीदार म्हणाला, आरएसएस नेत्यांची नावे देण्यास भाग पाडले!

असा असणार ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’

 

हल्लेखोर हे गॊवंडी शिवाजी नगर परिसरातीलच राहणारे असून दोघे समलिंगी असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या दोघांचे अश्लील व्हिडीओ मृत तरुण वसीम यांच्या मोबाईलमध्ये होते व तो या दोघांना या व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करीत होता अशी माहिती समोर येत आहे. या वादातूनच या दोघांवर हल्ला झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून माहीम पोलिसांचे एक पथक नागपूरला रवाना झाले असून पोलिसांनी नागपूर येथून एकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याबाबत पोलिसांनी अधिकृत कुठलीही माहिती देण्यास नकार दिला असून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा