28 C
Mumbai
Monday, March 16, 2026
घरक्राईमनामाहॉस्पिटलच्या टेरेसवर सहा वर्षीय मुलीवर बलात्कार

हॉस्पिटलच्या टेरेसवर सहा वर्षीय मुलीवर बलात्कार

Google News Follow

Related

मुंबईतील नावाजलेले सायन रुग्णालयाच्या इमारतीत एका चिमुरड्या मुलीसोबत अतिप्रसंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपत्कालीन विभागाच्या इमारतीच्या टेरेसवर सहा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग झाल्याचे वृत्त आहे. रुग्णालय परिसरात कचरा वेचणाऱ्या २४ वर्षीय तरुणानेच अतिप्रसंग केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

सुरज गायकवाड असे या आरोपीचे नाव असून सायन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या आरोपीने मुलीला तुझी आई बोलवत आहे, असे सांगून बोलावून घेतले आणि चॉकलेटचे आमिष दाखवून पीडित मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

रविवारी सायंकाळी सायन रुग्णालयातील आपत्कालीन विभागाच्या इमारतीच्या टेरेसवर हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी सायन पोलिस ठाण्यात आरोपी सुरज गायकवाड विरोधात भादंवि कलम ३५४ सह ८, १२ पोस्को २०१२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

‘अभिनंदन राहुलजी, तुम्ही जगातील कमिशनचा रेकॉर्ड मोडला आहे’

अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं; ९ जणांना वाचवण्यात यश

आता ‘मंगळ’मय केचप खा!

भोपाळमधील रुग्णालयाला आग; ४ बालकांचा मृत्यू

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातही बलात्काराचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेमध्ये नात्याने एकमेकींच्या चुलत जावा असलेल्या दोन पीडित महिलांनी एकमेकींच्या पतींविरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे. राजगड पोलिसांनी याप्रकरणी दोन गटातील चार जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा