28 C
Mumbai
Friday, September 17, 2021
घरक्राईमनामा...तिने टूथब्रशला लावलेली पेस्ट ठरली जीवघेणी!

…तिने टूथब्रशला लावलेली पेस्ट ठरली जीवघेणी!

Related

निष्काळजीपणामुळे कसे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते, याचे उदाहरण म्हणून धारावीतील या घटनेकडे पाहिले पाहिजे. अर्थात, हा अपघात आहे की, नेमके काय आहे, याचा तपास आता पोलिस घेतील.

एका तरुणीने चुकून आपल्या टूथब्रशवर उंदीर मारण्याच्या औषधाची पेस्ट लावल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. १८ वर्षांची अफसाना सकाळी झोपेतून उठून थेट मोरीत गेली. तिने टूथब्रश काढून त्याच्यावर पेस्ट टाकली आणि दात घासत असताना अफसाना मोरीतच कोसळली.

कुटुंबीयांनी ताबडतोब तिला रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना अफसानाचा रात्री उशिरा मृत्यू झाला.
अफसानाच्या संपूर्ण शरीरात विष पसरल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.

मुंबईच्या धारावीत ही दुर्देवी घटना घडली असून अफसाना हिने दात घासताना चुकून टूथपेस्टऐवजी उंदीर मारण्याची पेस्ट ब्रश लावली आणि दात घासत असतांना काही वेळाने टूथपेस्टची चव आणि वास वेगळाच असल्याचे तिच्या लक्षात आले. आपण टूथपेस्ट ऐवजी उंदीर मारण्याची पेस्ट ब्रशला लावल्याचे तिला कळले. मात्र तो पर्यंत खूप उशीर झाला होता. तिने चूळ भरली मात्र तो पर्यंत उंदराचे विष तिच्या शरीरात गेले. रिकामे पोट असल्यामुळे विषाचा असर तात्काळ होऊन ती मोरीतच कोसळली.

हे ही वाचा:

करुणा शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळला

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जमिनीवरच अनधिकृत बांधकामे

कफ परेडचा समुद्रकिनारा व्यापला तेलगोळ्यांनी!

स्वतःच्या बुडा खाली काय जळते आहे ते आधी बघा

कुटुंबीयांनी अफसानाला जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना रात्री उशिरा अफसानाचा मृत्यु झाला. या प्रकरणी धारावी पोलिसानी अपमृत्यु ची नोंद केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,408अनुयायीअनुकरण करा
3,020सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा