29 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरक्राईमनामादत्तक हिंदू मुलांवर धर्मांतरासाठी दबाव, १७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

दत्तक हिंदू मुलांवर धर्मांतरासाठी दबाव, १७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

पीडित हिंदू मुलीची आई मुस्लिम महिलेची मैत्रीण असल्यामुळे त्यांनी मुलाचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारली

Google News Follow

Related

आई वडिलांच्या निधनानंतर बेघर झालेल्या तीन मुलांना दत्तक घेण्यात आलेल्या मुस्लिम कुटुंबीयां कडून बळजबरीने त्यांचे धर्मातर केल्याचा संतापजनक प्रकार मुंबई जवळ असलेल्या पालघर जिल्ह्यातील मीरारोड येथे घडला.एवढ्यावर न थांबता या कुटुंबियातील एका तरुणाने दत्तक घेतलेल्या मुलांपैकी १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी पोलिसानी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे.  

कांदिवलीतील डहाणूकर वाडी परिसरात भाडेतत्वावर राहणाऱ्या हिंदू कुटुंबातील १७ वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांचे कोरोनामध्ये मृत्यु झाला होता, त्यानंतर १७ वर्षीय मुलीची तिचा लहान भाऊ आणि मावस बहिणीची जवाबदारी आईवर येऊन ठेपली होती. काही महिन्यांपूर्वी आईने देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर ही तिनही मुले अनाथ झाली होती. त्यात घर भाड्याचे असल्यामुळे त्यांना ते सोडावे लागले व तिघांवर बेघर होण्याची वेळ आली. 

दरम्यान एका गैरसरकारी संस्थेने तिघांची जबाबदारी घेऊन त्यांना एका आश्रमात ठेवले होते, मुले अनाथ व बेघर झाल्याचे पूर्वी पीडित मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबियांना कळले. पीडित हिंदू मुलीची आई मुस्लिम महिलेची मैत्रीण असल्यामुळे त्यांनी मुलाचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारून मुलांना संस्थेकडून दत्तक घेत त्यांना त्यांच्या मीरा रोड येथील घरी घेऊन आले. पीडित मुलगी ही मुंबईतील एका कॉलेजात १२वीचे शिक्षण घेत असून इतर दोघे शाळा शिकत होती.

हे ही वाचा:

हिमाचल मधील ११ हजार घरांचे नुकसान; राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी !

राहुल गांधी नव्या वास्तूच्या शोधात

सुप्रिया सुळेंना मदत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली

संजय ढवळीकर अखंड भारत व्यासपीठाचे नवे अध्यक्ष

८ ऑगस्ट रोजी खान कुटुंबातील १९ वर्षीय आरोपीने पीडिता घरात झोपली असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पीडित मुलीने मीरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अबुझैक खान तसेच शाहिन खान, नुझत खान आणि निखत मर्चंट यांच्याविरोधात बलात्काराप्रकऱणी कलम ३७६, ३७६(२)(एन) २९८, ५०६, ३४ सह बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा (पोक्सो) कलम ४ आणि ८ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यातील अबुझैक खान (१९) याला अटक केली असून त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असल्याची माहिती मीरा रोड पोलीसांनी दिली.    

धर्मांतरासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप….

या काळात खान कुटुंबिय धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप पीडीत मुलगी आणि तिच्या भावांनी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे. खान कुटुंबातील सदस्य पीडितेला बळजबरीने दर्ग्यात घेऊन जात होते तसेच तिच्या भावांना मांसाहार करायला लावायचे. हिंदू धर्माबद्दल सतत बदनामीकारक आणि द्वेषपसरविणारे वक्तव्य केले जात होते याशिवाय मुस्लिम धर्माबाबत घोषणा देण्यास सांगत होते असा आरोप पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. हे न केल्यास पुन्हा आश्रमात सोडून देण्याची धमकी देत होते, असे पीडितेने सांगितले. पीडित आणि तिच्या भावांनी धर्मपरिवर्तना साठी दबाव टाकत असल्याचा केलेल्या आरोपाबाबत आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा