26 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरक्राईमनामादिल्ली गँगवॉरमागे गोगी - टिल्लू गॅंगचे हाडवैर

दिल्ली गँगवॉरमागे गोगी – टिल्लू गॅंगचे हाडवैर

Google News Follow

Related

दिल्लीच्या प्रसिद्ध गुन्हेगारांच्या टोळीमध्ये गोगी टोळी ही प्रसिद्ध मानली जात होती. मात्र, दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात शुक्रवारी दुपारी या टोळीतील म्होरक्या मारला गेला. टिल्लू टोळीतील दोन दरोडेखोर त्याला मारण्यासाठी आले होते. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत टिल्लू टोळीचे दोन्ही गुंडही तेथे मारले गेले. गोगी आणि टिल्लू टोळीने गुन्हेगारी जगतात त्यांचा चांगलाच दबदबा निर्माण केला होता. या दोन्ही टोळ्यांनी आत्तापर्यंत २४ जणांना यमसदनास धाडले होते.

हरियाणवी गायिका हर्षिता दहियाची पानगीत गोगी आणि त्याच्या तीन साथीदारांनी गोळ्या घालून हत्या केली होती. बदमाशांनी गायिकेला छातीत अनेक गोळ्या झाडल्या होत्या. हर्षिताची हत्या गोगीने त्याचा मेहुणा दिनेश करालाच्या सांगण्यावरून केली होती. दिनेशने काही प्रकरणांमध्ये गोगीला मदत केली होती ज्यातून गोगीने हर्षिताच्या हत्येच्या बदल्यात करालाकडून पैसे घेतले नाहीत. घटनेच्या दिवशी हर्षिता तिच्या काही परिचितांसह पानिपतच्या चामराडा गावातून पुगथला मार्गे कारने कुठेतरी जात होती. चामराडाच्या बाहेर येताच एका कारने तिच्या कारला ओव्हरटेक केले आणि तिची कार थांबवून गोळ्या घातल्या.

गोगी आणि त्याच्या टोळीने नरेला येथे गोळ्या झाडून बसपा नेता वीरेंद्र मान यांचीही हत्या केली. वीरेंद्र हे खेड्यातील रहिवासी होते. त्याच्यावर अनेक खटलेही होते. गुन्हा केल्यानंतर बदमाशांनी नाहरपूर गावाच्या दिशेने पळ काढला.

जितेंद्र उर्फ गोगी आणि सुनील मान उर्फ टिल्लू पूर्वी एकत्र होते. २०१३ मध्ये जेव्हा दोघे विभक्त झाले तेव्हा टोळीतील काही बदमाश जितेंद्र आणि काही सुनील सोबत आले. दोन्ही टोळ्या एकमेकांच्या नंतर विरोधात उभ्या राहिल्या. त्यानंतर त्यांच्यात टोळीयुद्ध सुरू झाले. दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येने गुंड मरण पावले. त्यानंतर २०१६ मध्ये अलीपूरच्या गावांने यांच्यामध्ये समेट घडवून आणण्यासाठी पंचायत बोलावली होती. परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला. जितेंद्र आणि त्याच्या साथीदारांनी टिल्लूचा साथीदार सुनील मानचा भाऊ कुणाल याला मारहाण केली. यानंतर दोन्ही बाजूंनी टोळीयुद्ध सुरू झाले.

टिल्लूचा साथीदार राजू याची गोगीने २१ जानेवारी २०१५ रोजी आदर्श नगरमध्ये हत्या केली होती. बदला घेण्यासाठी टिल्लू टोळीने २३ फेब्रुवारी २०१५ रोजी अरुण कमांडोची हत्या केली. त्याचा साथीदार मनजीतही या हल्ल्यात ठार झाला. यानंतर, टिल्लू टोळीने सोनीपतमध्ये गोगीशी संबंधित निरंजन मास्टरची हत्या केली. त्या बदल्यात, टिल्लूचा सर्वात चांगला मित्र विकास उर्फ आलूचा भाऊ सुमीत याची गोगीच्या वतीने अलीपूरमध्ये हत्या करण्यात आली. ५ नोव्हेंबर २०१७ रोजी अलिपूरमध्ये अंकित नावाच्या शिक्षकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अंकित गोगी टोळीशी संबंधित होता. टिल्लू टोळीच्या बदमाशांनी हा खून केला होता.

हे ही वाचा:

महाराष्ट्र, कोल्हापूरचे संघ उपांत्य फेरीत; कोल्हापूरच्या मुलांचा संघ पराभूत

राज्य सरकारची मागणी फेटाळली; जिल्हा परिषद निवडणुका ठरल्याप्रमाणेच…

पंतप्रधान मोदींनी दिला पाकिस्तानला इशारा

आसामच्या घटनेमागे पीएफआयचा हात

 

१५ जानेवारी २०१८ रोजी रोहिणी न्यायालयाजवळ, मोनू उर्फ नेपाळी आणि त्याचा मित्र दिग्विजय यांच्यावर हल्ला झाला ज्यात नेपाळी ठार झाला. टिल्लू टोळीने बाकोलीचा रहिवासी अंकितच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी गोगीने टिल्लूशी संबंधित देवेंद्र प्रधानची हत्या केली. गोगी टोळीचे वर्चस्व कायम राहिले. त्याने स्वरूप नगरमध्ये दीपक उर्फ बंटीची हत्या केली. यानंतर, गायिका हर्षिता दहियाची सोनीपत येथे हत्या करण्यात आली, कारण ती एका खून प्रकरणात साक्षीदार होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा