31 C
Mumbai
Saturday, November 21, 2026
घरक्राईमनामाकुर्ल्यातील उद्यानात मुस्लिम मुलांचा तरुण-तरुणीवर प्राणघातक हल्ला

कुर्ल्यातील उद्यानात मुस्लिम मुलांचा तरुण-तरुणीवर प्राणघातक हल्ला

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

Google News Follow

कुर्ल्यातील फिनिक्स मॉलजवळ असलेल्या महानगरपालिकेच्या उद्यानात फोटो काढत असलेल्या एका तरुण आणि तरुणीला आठ अल्पवयीन मुलांनी घेरून त्यांच्यावर कथितरीत्या हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा स्थानिकांनी मोबाईलमध्ये चित्रित केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आठ अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण आणि तरुणी कुर्ल्यातील फिनिक्स मॉलजवळ असलेल्या महापालिकेच्या उद्यानात फोटो काढत होते. त्यावेळी आठ अल्पवयीन मुलांनी त्यांच्याशी वाद घालत दोघांनाही घेरले. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही तरुणांचा घोळका तरुण-तरुणीच्या आसपास जमल्याचे आणि त्यांच्यात झटापट सुरू असल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे उद्यानातील वातावरण तणावपूर्ण झाल्याचेही व्हिडीओतून दिसून येते.

सदर तरुण तरुणी फोटो काढत असताना ही मुले तिथे त्यांना त्रास देत होते. त्यावेळी मुलीने त्यांना बाजूला होण्यास सांगितले तेव्हा त्यांच्याच शाब्दिक चकमक झाली. त्यातून मुलीने एका मुलाच्या थोबाडीत लगावली. त्यानंतर आणखी मुस्लिम मुलांचा घोळका तिथे जमा झाला आणि त्यांनी या दोघांवर लाठ्या काठ्यांनी, लाथाबुक्क्यांनी हल्ला केला.

हे ही वाचा:

हाँगकाँग, नॅस्डॅकपेक्षा एनएसई वरचढ

परदेशी असूनही सोनिया गांधी मारुतीच्या ५० टक्के मालक कशा?

नवी मुंबई विमानतळावर विमानांची विक्रमी वाहतूक

भारतात जन्मलेल्या दहशतवाद्यांपासून जम्मू-काश्मीर ३५ वर्षांनी मुक्त!

या घटनेनंतर पीडित तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीच्या आधारे घाटकोपर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १८९(२), १८९(४), ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत आठ अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, या प्रकरणातील सर्व आठ मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार असून, त्यांच्याविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे सार्वजनिक ठिकाणी अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या अशा प्रकारच्या दादागिरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा