24 C
Mumbai
Wednesday, December 24, 2025
घरक्राईमनामागुजरात दंगल प्रकरणात सेटलवाड, श्रीकुमार यांच्यानंतर संजीव भट्ट यांना अटक

गुजरात दंगल प्रकरणात सेटलवाड, श्रीकुमार यांच्यानंतर संजीव भट्ट यांना अटक

Google News Follow

Related

गुजरात दंगल प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून गेले काही दिवस अटकसत्र सुरु आहे. दरम्यान, मंगळवार, १२ जुलै रोजी रात्री उशिरा अहमदाबाद पोलिसांनी सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करत तीन लोकांना अटक केली आहे. यामध्ये मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, माजी पोलीस महासंचालक आर. बी. श्रीकुमार आणि बडतर्फ आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना अटक केली आहे.

मागील बऱ्याच काळापासून संजीव भट्ट हे पालनपूर तुरुंगामध्ये अटकेत होते. पालनपूर तुरुंगामध्ये संजीव भट्ट यांना ताब्यात घेण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेची तुकडी त्यांना अहमदाबादमध्ये घेऊन गेली. आता गुजरात दंगल प्रकरणात संजीव भट्ट यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगल प्रकरणामध्ये निर्दोष लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ही अटक झाल्याची माहिती आहे.

गोधरा जळितकांडानंतर २००२ मध्ये गुजरातमध्ये दंगल उसळली होती. त्यात अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीतील काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांच्यासह एकूण ६९ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आणखी ६३ जणांना एसआयटीने निर्दोषत्व क्लीन चिट दिली होती.

२००२ मधील गुजरात दंगल हे मोठे षड्यंत्र असून त्यासंदर्भात पुन्हा चौकशी व्हावी अशी याचिका अहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी न्यायालयात दाखल केली होती. झाकिया जाफरी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली असून एसआयटीचा अहवाल कायम ठेवला आहे. त्यानंतर गुजरात एसआयटीने तिस्ता सेटलवाड यांना मुंबईतील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले होते.

हे ही वाचा:

अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा कुलाबा- वांद्रे मेट्रो ३ चा कार्यभार

मातोश्रीबाहेर मृत्युमुखी पडलेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात

‘सोनिया सेना मग शरद सेना आता रडकी सेना’

एमआयएमचे शंभरहून अधिक कार्यकर्ते देणार राजीनामे

पोलिसांनी या प्रकरणात तिस्ता सेटलवाड यांच्याशिवाय मूळ प्रकरण उघडकीस आणणारे ‘व्हिसल ब्लोअर’ मानले जाणारे माजी आयपीएस अधिकारी आर. बी. श्रीकुमार यांना नुकतीच अटक केली आहे. गुजरात दंगलींबाबत चुकीची माहिती दिल्याचा आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा