29 C
Mumbai
Monday, October 2, 2023
घरविशेषअश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा कुलाबा- वांद्रे मेट्रो ३ चा कार्यभार

अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा कुलाबा- वांद्रे मेट्रो ३ चा कार्यभार

Google News Follow

Related

शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत येताच मुंबई मेट्रो ३ कारशेड संदर्भात या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा एकदा कुलाबा- वांद्रे मेट्रो ३ चा कार्यभार देण्यात आला आहे. यापूर्वी फडणवीस सरकारच्या काळातही त्यांच्याकडे ही जबाबदारी होती. मात्र, महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती.

मेट्रो ३ च्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन अश्विनी भिडे यांची २०२० साली जानेवारी महिन्यात बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्याच वर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस त्यांच्यावर करोना विषाणू व्यवस्थपानाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.

अश्विनी भिडे या १९९५ च्या बॅचच्या आएएस अधिकारी आहेत. डिसेंबर महिन्यात शिवसेना आणि अश्विनी भिडे यांच्यात आरे कारशेडच्या मुद्द्यावरुन मतभेद झाले होते. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती.

आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेडप्रकरणी अश्विनी भिडे यांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये न्यायालयाकडून मेट्रो कारशेडला हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्याविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावर तत्कालीन मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी ट्विट करुन भूमिका मांडली होती. या विषयी भिडे यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, “काही लोकं स्वत:ला न्यायालयापेक्षा उच्च समजत आहेत. या लोकांचं वागणं बेकायदेशीर असून तुम्ही न्यायालयात लढाई हरला असाल तर रस्त्यावर उतरण्याऐवजी सन्मानानं पराभव मान्य करा,” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

हे ही वाचा:

मातोश्रीबाहेर मृत्युमुखी पडलेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात

‘सोनिया सेना मग शरद सेना आता रडकी सेना’

एमआयएमचे शंभरहून अधिक कार्यकर्ते देणार राजीनामे

केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्बफेक

अश्विनी भिडे यांच्यासोबतच आणखीही काही अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. श्रीकांत परदेशी (२००१ बॅच) यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ भाऊसाहेब दांगडे (२०११ बॅच) यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
102,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा