जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. शनिवारी (३० ऑगस्ट) गुरेझमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवादी बागू खानला ठार केले आहे. बागू खान समंदर चाचा म्हणून ओळखला जात होता. दहशतवादी टोळ्यांमध्ये बागू खानला ‘ह्युमन जीपीएस’ असे म्हटले जात असे. बागू खानला ठार केल्याने दहशतवादी संघटनांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
बागू खान १९९५ पासून पीओकेमध्ये राहत होता. सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांनुसार, बागू खानने गुरेझ सेक्टरच्या विविध भागातून १०० हून अधिक घुसखोरीच्या प्रकरणात मदत केली होती. यापैकी बहुतेक प्रयत्न यशस्वी झाले कारण त्याला या प्रदेशातील कठीण भूभाग आणि गुप्त मार्गांची सखोल माहिती होती. यामुळे तो सर्व दहशतवादी गटांसाठी खास बनला होता.
तो हिजबुल कमांडर असताना, त्याने नियंत्रण रेषेवरील गुरेझ आणि शेजारच्या सेक्टरमधून घुसखोरीचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात प्रत्येक दहशतवादी संघटनेला मदत केली होती. याच दरम्यान, गुरुवारी (२८ ऑगस्ट) जम्मू आणि काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न करताना सुरक्षा दलाने बागू खानला ठार केले. या चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार झाला.
हे ही वाचा :
पंतप्रधानांचे चीनमध्ये आगमन, ७ वर्षांनंतर पहिलाच दौरा!
ट्रम्पचा टॅरिफ: “पुढील ५ वर्षांत आयात कमी करणे हे आपले तात्काळ ध्येय असले पाहिजे”
‘मराठा आरक्षण’: फडणवीस म्हणाले, “दबावाखाली संविधानाच्या चौकटीबाहेर घेतलेले निर्णय टिकत नाहीत”
भारतात प्रचंड जीडीपी वाढीची क्षमता, स्पर्धकांपेक्षा आमचे प्रदर्शन चांगले
सुरक्षादलांनी विशिष्ट गुप्त माहितीनंतर शोधमोहीम राबवली, त्यादरम्यान ही कारवाई झाली. बागू खानच्या मृत्यूनंतर परिसरात शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. संबंधित यंत्रणांनी ही मोठी कामगिरी मानली असून, त्याचा निकाल सीमावर्ती भागातील सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.







