उत्तर प्रदेशातील शामली येथे पोलिसांनी इमामुद्दीन अन्सारी नावाच्या बंगाली मुस्लिमाला अटक केली आहे. इमामुद्दीन १५ वर्षांपासून मानती हसनपूर गावातील एका मंदिरात महात्मा म्हणून राहत होता. त्यांच्याकडून दोन बनावट आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
वृत्तानुसार, त्याने गावप्रमुखाकडून मंदिरासाठी जमीन घेतली होती आणि देणग्या गोळा करून एक मंदिर बांधले. याठिकाणी तो राहत होता. मात्र, आरोपी इमामुद्दीन वारंवार पश्चिम बंगालला जात असल्याने लोकांमध्ये संशय निर्माण झाला. गावकऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा त्याच्या खोलीतून दोन आधार कार्ड सापडले. एकावर बंगाली नाथ तर दुसऱ्या आधारकार्डवर इमामुद्दीन अन्सारी असे नाव होते.
जप्त करण्यात आलेल्या आधारकार्डवर पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथील पत्ता होता. हे प्रकरण उघडकीस येतास सर्वांनाच धक्का बसला आहे. गुप्तचर संस्थेने (आयबी) त्याची चौकशीही केली आहे. तो एखाद्या मोठ्या नेटवर्कचा भाग असू शकतो असा पोलिसांना संशय आहे. आरोपी इमामुद्दीनला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
एसपी म्हणाले की, पोलिसांनी आरोपीविरुद्ध बनावट कागदपत्रे बनवणे आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला कैराना न्यायालयात हजर केले, जिथून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
एसपी पुढे म्हणाले, सध्या आरोपींच्या इतर कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्या नाहीत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. तपासात जे काही तथ्य समोर येईल त्याच्या आधारे कारवाई केली जाईल. दुसरीकडे, ही बाब उघडकीस आल्यानंतर, तपास यंत्रणा देखील या प्रकरणाचा तपास करण्यात गुंतल्या आहेत.
हे ही वाचा :
पाकिस्तानमध्ये १४० मुलांसह २९९ जणांचा मृत्यू
कुलगाममध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरूच
राहुल गांधीचा ‘अणुबॉम्ब’ तेजस्वी यादव यांच्या घरावरच पडला
जादूटोण्याच्या संशयावरून व्यक्तीची हत्या, गुप्तांग कापून मृतदेह धरणात फेकला!
एसपीच्या म्हणण्यानुसार, इमामुद्दीन अन्सारीच्या आधार कार्डवर लिहिलेल्या पत्त्याची पडताळणी करण्यासाठी आणि त्याच्याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी एक पोलिस पथक पश्चिम बंगालला रवाना करण्यात आले आहे.







