28 C
Mumbai
Saturday, July 24, 2021
घरक्राईमनामासोनी, मोठकरीची एनआयएला करायची आहे अधिक चौकशी

सोनी, मोठकरीची एनआयएला करायची आहे अधिक चौकशी

Related

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी मनीष सोनी आणि सतीश मोठकरी यांना एनआयए कोर्टात हजर केले.

सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने सांगितले की, हत्येदिवशी या लोकांच्या व्यतिरिक्त आणखी काही लोक हत्येच्या ठिकाणी उपस्थित होते का याची आम्हाला माहिती हवी आहे. आरोपी सतीश मोठकरीकडे आम्हाला ३५ हजार ४०० रुपये मिळालेत ते त्याला कोणी दिले याचा तपास करायचा आहे. मनीष सोनी आणि सतीश मोठकरी या दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली आमच्याकडे दिली आहे.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपींना चकमकफेम प्रदीप शर्मा यांनी काही सिमकार्ड यांनी पुरवले, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने न्यायालयात दिली. ३५ हजारांच्या रकमेबाबत कोर्टाने एवढी मोठी रक्कम नाहीये, अस म्हणताच एनआयएच्या वकिलांनी म्हटलं की लोक ५ हजार रुपयांसाठीही हत्या करतात.

हे ही वाचा:

विधानसभा अध्यक्षपद निवडीच्या हालचालींना वेग

शिंदे, पालांडे यांची कोठडी ६ जुलैपर्यंत वाढविली

दहा हजार गुंड आणण्याचे आदेश मातोश्रीवरून?

सहआयुक्त संखेंच्या बदलीमुळे अनधिकृत बांधकामांना अभय ?

हत्येनंतर आरोपी नेपाळला गेले होते ते कोणाच्या सांगण्यावरून आणि का गेले होते याचा तपास आम्हाला करायचा आहे म्हणून आम्हाला त्यांची कोठडी हवी आहे, असे पुढे एनआयएकडून न्यायालयाला सांगण्यात आले. या पूर्ण प्रकरणात करोडो रुपये वापरण्यात आलेत आतापर्यंत आम्हाला फक्त ४५ लाखांचे व्यवहार हाती लागलेत जे या प्रकरणात अतिशय कमी आहेत असं आम्ही मानतो, असेही एनआयएने म्हटले आहे. आम्हाला यातला पैशाचा माग काढायचा आहे, असेही एनआयएने म्हटले आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाशेजारी स्फोटके ठेवण्यापासून मनसुखच्या हत्येपर्यंत करोडो रुपये वापरण्यात आले. त्यातील ४५ लाख रुपयांची माहिती गोळा करण्यात एनआयएला यश आले आहे. या प्रकरणातील इतर रकमेची माहिती आम्हाला गोळा करायची आहे. त्यासाठी आरोपींना ५ दिवसांच्या कोठडीची मागणी एनआयएने केली. आरोपीना ५ जुलै पर्यंत एनआयए कोठडीत वाढवण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,289अनुयायीअनुकरण करा
1,970सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा